17/12/2024

करमाळ्याच्या राजकारणात युथब्रिगेड सक्रीय; राजकीय आखाड्यात दुसऱ्या पिढीचे कारभारी

0
IMG_20230831_165215.jpg

करमाळा, दि. 31 (गौरव मोरे)-

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील राजकीय आखाडा राज्याच्या कोन्याकोपयात पहिल्यापासून प्रसिद्ध आहे. मागील काही वर्षांपासून राजकीय आखाड्यात फड गाजविणारे धुरंधर आपल्या दुसऱ्या पिढीला राजकारणात सक्रिय करू लागले आहेत. हे राजकीय वारसदारदेखील आपापल्या कुवतीनुसार राजकीय पटावर सक्रिय होताना दिसत आहे.

या राजकीय आखाड्यात शिवसेनेचे माजी आमदार नारायण आबा पाटील, आमदार संजय मामा शिंदे, माजी आमदार जयवंतराव जगताप तसेच माजी मंत्री कै. दिगंबरराव बागल यांची दुसरी पिढी आघाडीवर आहे.

1) पृथ्वीराज पाटील-

कुठल्याही प्रकारचा राजकीय वारसा नसताना ग्रामपंचात सरपंच पासून पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य, सहकारी संस्था, साखर कारखाने ते विधानसभा सदस्य पर्यंत राजकारणाची एकेक सूत्रे जिंकत सध्याचे शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांनी करमाळा तालुक्यावर पकड मजबूत केली. 2014 विधानसभा जिंकत घराणेशाही मोडीत काढली, त्यांची दुसरी पिढीही सध्या राजकारणात सक्रीय झालेली आहे. माजी आमदार नारायण पाटील यांचे सुपुत्र पृथ्वीराज पाटील सध्या राजकारणात युथब्रिगेड म्हणून सक्रीय झालेले आहेत. युवा मतदारांमध्ये जाऊन त्यांनी चांगल्या प्रकारे राजकीय सुरूवात केलेली आहे तर आगामी काळात माजी आमदार पाटील यांचा वारसदार म्हणून पृथ्वीराज पाटील यांच्याकडे पाटील गटाचे कार्यकर्ते पाहत आहेत.

2) वैभवराजे जगताप आणि शंभूराजे जगताप-

दुसरीकडे माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे सुपुत्र माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप हेही राजकारणात सक्रीय झालेले आहेत, नगरपालिका निवडणूकीत जनतेतून नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. तर नगराध्यक्ष असताना त्यांनी करमाळा तालुक्यातील जनतेची विकास कामे करण्यावर भर दिला होता सध्या वैभवराजे जगताप यांनी ठाकरे गटात प्रवेश केलेला असून संधी मिळाली तर आगामी विधानसभा ठाकरे गटाकडून लढविणार असल्याचे बोलले जाते. तसेच माजी आमदार जगताप यांचे दुसरे चिरंजीव शंभूराजे जगताप ही राजकारणात सक्रीय झालेले असून तालुक्यातील युवकांची मोट बांधण्यात चांगले यशस्वी झालेले आहेत. सध्या माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा वारसदार म्हणून वैभवराजे जगताप आणि शंभूराजे जगताप हेच राहणार असल्याचे बोलले जात आहे.

3) रश्मी बागल आणि दिग्विजय बागल

तर एकेकाळी तालुकाभर माजी मंत्री कै दिगंबरराव बागल यांची पकड होती, त्यांचा 2005 साली आकस्मिक निधन झाले, बागल गटावर संकट आले परंतु संकटातून बाहेर येत माजी आमदार श्यामल बागल 2009 साली आमदार म्हणून निवडून आल्या. त्यानंतर त्यांची दुसरी पिढी म्हणजेच बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रीय झालेल्या असून तालुक्यातील श्री मकाई कारखान्यावर मजबूत पकड केलेली असून मागील 2014 आणि 2019 विधानसभा निवडणूकीत झालेला पराभव झाला असला तरी त्या सध्या सक्रीय आहेत तसेच प्रत्येक कामात अग्रेसर ही राहतात. तसेच राष्ट्रवादी सोडून त्या आता शिवसेनेत (ठाकरे गट) आहेत तर त्यांचे बंधू मकाई कारखान्याचे माजी चेअरमन दिग्विजय बागल ही राजकारणात सक्रीय आहेत. बागल गटाची धुरा जबाबदारीने सांभाळत असून बागल गट आणि शिवसेना या माध्यमातून ते सध्या गावोगावी सक्रीय झालेले असून आगामी 2024 च्या विधानसभेची तयारी आतापासून होताना पहायला मिळत असून माजी मंत्री कै दिगंबरराव बागल यांचे वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.

4) यशवंत शिंदे-

करमाळा तालुक्यात 2019 विधानसभेला करीष्मा करून आमदार संजय मामा शिंदे विधानसभेवर निवडून गेले आणि करमाळा तालुक्याला नवीन पर्याय मिळाला, सध्या आमदारकीच्या माध्यमातून त्यांचा विकासकामांवर भर असून करमाळा तालुक्यातील प्रत्येक गावागावात पोहचण्याचा व गट वाढविण्यासाठी ते सक्रीय आहेत तर त्यांचे चिरंजीव यशवंत शिंदे हेही सध्या राजकारण सक्रीय होताना दिसून येत आहेत, यशवंत शिंदे हे निमगावं (टे) ग्रामपंचायतच्या निवडणूकीत बिनविरोध सरपंच म्हणून निवडून आलेले असून युवा कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन ते शिंदे गट आणि जन संपर्क वाढवित असून आमदार संजय मामा शिंदे यांची दुसरी पिढी म्हणून त्यांच्या कडे पाहिले जात आहे.

एकीकडे राजकीय लढाई लढताना या नेत्यांनी वयाची पन्नाशी कधी ओलांडली, हे त्यांच्याही लक्षात आले नाही. आता त्यांचे वारसदारही राजकारणात उतरले असून सध्यातरी स्थिरस्थावर होऊ लागलेले आहेत. आगामी काळात कोण युथब्रिगेड होणार हा येणारा काळच सांगेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page