पोफळजच्या अर्चना पवार-शिंदे यांची पुणे महानगरपालिकेत शिक्षिका पदी नियुक्ती झाल्याबद्दल सन्मान



करमाळा, दि. ३ (करमाळा-LIVE)-
महाराष्ट्र शासनाच्या नुकत्याच झालेल्या शिक्षक भरती निवड प्रक्रियेत पोकळजचे माजी सरपंच मारूती पवार यांची कन्या अर्चना मंगेश शिंदे यांना पुणे महानगरपालिकेत शिक्षिका पदी नियुक्ती मिळाली आहे.
या निवडीबद्दल पोफळजचे दत्तात्रय पवार-पाटील, तसेच आदर्श शिक्षिका रेखा साळुंके-शिंदे, मुख्याध्यापक अंकुश अमृळे यांनी अर्चना पवार-शिंदे यांचा सन्मान केला.
यावेळी माजी सरपंच मारूती आप्पा पवार, तुकाराम बप्पा पवार, श्री सुरवसे, शिक्षक पांडुरंग गुटाळ, जहांगीर सय्यद, निलेश जाधवर, शुभांगी बोराटे, मुमताज फकीर, यांनी अर्चना पवार-शिंदे यांचे अभिनंदन केले.
शिक्षिका अर्चना पवार-शिंदे यांचे प्राथमिक शिक्षण जि.प शाळा पोफळज येथे तर माध्यमिक शिक्षण कर्जत येथे घेतले आहे तर पानीव येथे इंग्रजी माध्यमातून डी.एड पदविका पूर्ण केली. त्यांच्या नियुक्तीबद्द्ल पोफळज ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.



