17/04/2026

तालुकास्तरीय टॕलेंट हंट स्पर्धेत पोफळजची काव्यांजली पवार तालुक्यात प्रथम

0
IMG_20231208_190420.jpg

जेऊर, दि. 9 (करमाळा-LIVE)-
तालुकास्तरीय टॕलेंट हंट स्पर्धेत करमाळा तालुक्यातील पोफळज येथील काव्यांजली प्रदीप पवार हीचा करमाळा तालुक्यात पहिला क्रमांक आलेला असून तिची मोहोळ येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.

करमाळा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या टॕलेंट हंट निबंध स्पर्धेत इयत्ता पहिली ते पाचवी गटात पोफळज जिल्हा परिषदेची इयत्ता तिसरीची विद्यार्थ्यीनी काव्यांजली पवार हीचा करमाळा तालुक्यात पहिला क्रमांक आलेले आहे. “माझे बाबा” याविषयी तिने निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेला आहे.

यासाठी कु. काव्या हिला वर्ग शिक्षिका लोंढे मॕडम यांचे मार्गदर्शन लाभले, तर तिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page