06/06/2025

राष्ट्रवादी काँग्रेस- शिंदे गट आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका स्वबळावर लढवणार- अॕड शिवराज जगताप

0
IMG-20250118-WA0001.jpg

करमाळा, दि. १९ (करमाळा-LIVE)-
आगामी होणाऱ्या करमाळा नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तसेच आदिनाथ कारखाना या सर्व निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस आणि माजी आमदार संजयमामा शिंदे गट स्वबळावर लढवणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष अॕड शिवराज जगताप यांनी प्रसिद्ध पत्रकाव्दारे
द्वारे दिली आहे.

नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या, लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका होणार आहेत यावेळी विधानसभेचे निर्णायक मतदान पाहता करमाळा तालुक्यातील नागरिकांनी संजय मामा यांना अपक्ष असताना देखील निर्णयक आघाडी दिलेली आहे यातूनच असे कळते की होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती गण गटांमध्ये निश्चितच संजय मामा शिंदे यांना मानणारा मोठा वर्ग असल्यामुळे पंचायत समिती जिल्हा परिषदेला बहुमत मिळवण्यासाठी निश्चितच जनता संजयमामांच्या पाठीशी आहे.

तसेच विकास कामांच्या बाबतीत बोलावयाचे झाल्यास उपमुख्यमंत्री अजित दादा पवार तसेच राज्यातील सत्ता केंद्रातील सत्ता यामुळे नगरपालिका असो पंचायत समिती जिल्हा परिषद यामध्ये मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून विकास कामे केवळ मामाच करू शकतात आणि तालुक्यातील जनतेला आता विकास कामे होणे महत्त्वाचे आहे यामुळे नगरपालिका असो या जिल्हा परिषद या निवडणुकीमध्ये जनता निश्चितपणे मामाच्या पाठीशी उभी राहणार आहे यामुळे येणाऱ्या आगामी निवडणुका संजय मामा गट स्व बळावर लढणार असून त्यामध्ये निश्चितच विजय मिळवणार आहे असे मत श्री जगताप यांनी व्यक्त केले

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page