10/06/2026

जेऊरच्या नवभारत इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न

0
IMG-20250118-WA0002.jpg

जेऊर, दि. १९ (करमाळा-LIVE)-
जेऊर येथील नवभारत इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित विज्ञान प्रदर्शनाला पालक व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विज्ञान उपकरणांचे उपस्थित सर्वांनी कौतुक केले.

विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळावा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

या प्रदर्शनात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यांनी तयार केलेल्या विविध विज्ञान उपकरणांची सखोल माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. लहानग्यांच्या या सर्जनशीलतेने उपस्थितांच्या मनात कुतूहल निर्माण केले.

कार्यक्रमाला पालक व ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी डॉ. वैभव पाटील, प्रा. रमेश पाटील, नितीन पवार, प्रसाद कन्हेरे, सिताराम पोळ, सोमनाथ खबाले, देविदास वाघमोडे, प्रफुल्ल काळे, अतुल पवार, कैलास काळे, रामेश्वर ठोकळ, आदिनाथ मारकड, सोनाली माने, प्रदीप चिंचकर यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी सादर केलेले उपक्रम शैक्षणिक दृष्टिकोनाने महत्त्वपूर्ण असल्याचे उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page