कुंभेजच्या बागल विद्यालयात जागतिक ‘हात धुवा’ दिन साजरा


करमाळा, दि. 17 (करमाळा-LIVE)-
अस्वच्छतेमुळे विविध आजारांचा संसर्ग होतो, बहुसंख्य आजारांचा संसर्ग हातांची स्वच्छता न राखल्याने होतो. परिणामी मानवी आरोग्य धोक्यात येते. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्या बाबत जाणीव जागृती निर्माण होऊन स्वच्छतेच्या सवयींतून वर्तन बदल अपेक्षित आहे. या जाणिवेतून प्रतिवर्षी 15 ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक हात धुवा दिन ‘ म्हणून साजरा करण्यात येतो.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी यांचे आदेशान्वये व मुख्याध्यापक हनुमंत पाटील यांचे मार्गदर्शनाखाली कुंभेज येथे दिगंबरराव बागल माध्यमिक विद्यालयात हात धुवा दिन अर्थात हस्त प्रक्षालन दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी विद्यालयातील शिक्षक कल्याणराव साळुंके, सिताराम बनसोडे, संतोष शिंदे, विष्णू पोळ, दादा जाधव यांनी विद्यार्थ्यांना हात धुन्याचे पाच प्रकार प्रात्यक्षिकांसह करून दाखविले.
सर्वांनी हात स्वच्छ असण्याचे महत्व समजून घेतले व यापुढे नेहमी ही आरोग्यपूर्ण सवय अंगीकारण्याचा संकल्प केला.
या उपक्रमासाठी विद्यालयातील इयत्ता 10 वीची विद्यार्थिनी कु. समृद्धी भागवत पवार हीने हॅन्डवॉश पॅक भेट म्हणून दिला. याबद्दल मुख्याध्यापक श्री. पाटील सर यांनी तिचे अभिनंदन केले. सदर उपक्रमास सेवक, किशोर कदम, बलभीम वाघमारे, संतोष घोरपडे, नंदकुमार कांबळे यांनी सहकार्य केले.
हात स्वच्छ न धुतल्याने विविध संसर्ग होऊ शकतात त्यामुळे विविध आजारांना हे आमंत्रणच ठरते याचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊन शैक्षणिक नुकसान होते. या बाबी ध्यानात घेऊन आमच्या विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक व सार्वजनीक आरोग्य विषयक उपक्रम सातत्याने राबवले जातात.
हनुमंत पाटील, मुख्याध्यापक


- भारत प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनविले आकाश कंदील व भेटकार्ड
- सोलापूर सामाजिक वनीकरण विभागाकडुन आयोजित स्पर्धेत जेऊरच्या भारत हायस्कूलची आरूषी बादल प्रथम तर शिवानी कुंभार तृतीय
- स्वतःचा कारखाना विकणाऱ्या माजी आमदार शिंदे आणि त्यांच्या गटाने आदिनाथची काळजी करू नये- पाटील गट
- जेऊर येथील ओंकार पोळ याचे प्रथम पुण्यस्मरण ; केम व शेटफळ येथे विद्यार्थ्यांना भोजन व शालेय साहित्यांचे वाटप
- कोर्टीच्या सरपंच भाग्यश्री नाळे-मेहेर यांना ग्रामररत्न सरपंच पुरस्कार जाहीर