जेऊर ग्रामपंचायत निवडणूक : सरपंचपदासाठी पृथ्वीराज पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखला

जेऊर, दि. 18 (करमाळा-LIVE)- करमाळा तालुक्याची राजधानी आणि तालुक्यातील राजकारणातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या जेऊर ग्रामपंचायत निवडणुकीच्या सरपंचपदासाठी शिवसेनेचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांचे चिरंजीव पृथ्वीराज पाटील यांनी आज असंख्य कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
युवानेते पृथ्वीराज पाटील यांची राजकीय नवी इनिंग जेऊर ग्रामपंचायत निवडणुकीतून होणार आहे. दरम्यान जेऊर ग्रामपंचायत साठी सरपंचपदासह 15 जागांसाठी निवडणूक होणार आहे. एकूण पाच प्रभाग असून प्रत्येक प्रभागातून तीन उमेदवार असणार आहे.
जेऊर ग्रामपंचायत प्रभाग निहाय आरक्षित जागा-
प्रभाग क्र. १- (एकूण ३ जागा)-
अनुसुचीत महिला (एसस्सी SC महिला)- १ जागा
नागरिकांचा मागस प्रवर्ग (ओबीसी)- १ जागा
सर्वसाधारण (ओपन)- १ जागा
प्रभाग क्र. २ (एकूण ३ जागा)-
अनुसुचीत जाती (एसस्सी SC)- १ जागा
नागरिकांचा मागस प्रवर्ग (ओबीसी)- १ जागा
सर्वसाधारण (ओपन)- १ जागा
प्रभाग क्र ३-(एकूण ३ जागा)-
सर्वसाधारण (ओपन)- १ जागा
सर्वसाधारण महिला (ओपन महिला)- २ जागा
प्रभाग क्र ४- (एकूण ३ जागा)–
सर्वसाधारण (ओपन)- १ जागा
सर्वसाधारण महिला (ओपन महिला)- २ जागा
प्रभाग क्र ५- (एकूण ३ जागा)-
नागरिकांचा मागस प्रवर्ग महिला (ओबीसी महिला)- १ जागा
सर्वसाधारण (ओपन)- १ जागा
सर्वसाधारण महिला (ओपन महिला)- १ जागा
एकूण जागा १५ जागांसाठी, पुरूष- ७ जागा तर महिला-८ जागांसाठी निवडणूक होणार आहे.


- करमाळ्याचे पर्यावरणप्रेमी कल्याणराव साळुंके यांना पर्यावरण कार्यासाठी पुरस्कार प्रदान
- कुंभेजच्या बागल विद्यालयात भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन व पारितोषिक वितरण संपन्न
- भारत हायस्कूल जेऊर येथे जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा संपन्न
- उजनी बॕकवॉटर परिसरात चोरांचा धुमाकूळ ; दिवेगव्हाण येथे मोटारीच्या तांब्याच्या तारा चोरीला- प्रशासनाचे दुर्लक्ष
- करमाळा : गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची आजपासून व्याख्यानमाला
