08/06/2025

आठवणीतील डिगा मामा; स्व. दिगंबरराव बागल यांना विनम्र अभिवादन

0
IMG_20230205_092543.jpg

करमाळा, दि. 5 (करमाळा-LIVE वृत्त सेवा)-
लहानापासून मोठ्यांपर्यंत, मुंबईपासून ते नागपूरपर्यंत, चांदयापासून बांध्यापर्यंत आणि मुंबईपासून ते मांगीपर्यंत सर्वांचेच प्रिय असणारे माजी राज्य मंत्री, माजी आमदार स्व.दिगंबरराव (डिगा मामा) बागल यांची आज पुण्यतिथी असून त्यांचा हलगी वाजवतानाचा व्हिडीओ खूपच अप्रतिम असून व्हिडीओ पाहिल्यावर खरोखरच उत्साह आल्या शिवाय राहणार नाही.

5 फेब्रुवारी 2006 हा करमाळा तालुक्यासाठी काळा दिवस आहे, माजी मंत्री कै. दिगंबरराव (डिगा मामा) बागल यांचे निधन झाले होते. 5 फेब्रुवारी 2006 सायंकाळची ती घातक वेळ होती. काळाची गतीसुद्धा क्षणभर थांबली. रोज किलबिल करणारे पक्षीही मूक झाले होते. वातावरणात एक उदासी आली होती.
अनेक मान्यवर मामांच्या अकाली जाण्याने हळहळले, गहिवरले, मांगी गावसह तालुक्यातील कोणत्याही घरात त्यादिवशी चूल पेटली नाही. सर्वत्र केवळ आणि केवळ मामांच्या आठवणींना वाट मोकळी करून देत सर्वसामान्य जनता अक्षरशः धाय मोकलून रडत होती. करमाळा तालुक्याचे भाग्यविधाते, हरितक्रांतीचे प्रणेते, माजी राज्यमंत्री, आदरणीय दिगंबररावजी बागल (मामा) यांचे सोलापुरात अकस्मात निधन झाले. आज या दुर्दैवी घटनेला पाहता पाहता 17 वर्षे झाली.

मामा तालुक्यातील जनतेचे नेते होते आणि त्यांच्या कार्यामुळे ते लोकनेते झाले. करमाळा तालुक्याला स्व. दिगामामांच्या रूपाने मंत्रीपदाची संधी मिळाली. वास्तविक पाहता तालुक्याचे एक धडाडीचे नेते म्हणून मामांनी संपूर्ण तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या मनावर राज्य केले. विरोधकांनाही मामांनी आपल्या वागण्यातून व आपुलकीने आपलेसे केले होते. विरोधकांच्या योग्य व विधायक कामांना त्यांनी न्याय दिला. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी जनसेवाच केली.

स्व दिगंबरराव बागल यांचा हलगी वाजवतानाचा व्हिडीओ

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page