लग्नाचे अमिष दाखवून अपहरण करून बलात्कार केल्याप्रकरणी एकास जामीन मंजूर
सदर प्रकरणी आरोपीतर्फे अॕड निखिल पाटील व अॕड दत्तप्रसाद मंजरतकर यांनी काम पाहिले.
करमाळा, दि. 31 (करमाळा-LIVE)-
लग्नाचे अमिष दाखवून अपहरण करून बलात्कार केल्याप्रकरणी एकास जामीन मंजूर झाला आहे.
याबाबत हकीकत अशी की, 23 मार्च 2023 रोजी एका अल्पवयीन युवतीस लग्नाचे आमिष दाखवून फुस लावून पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी शंभूराजे अशोक पवार (वय 25 वर्ष) राहणार साठे गल्ली, माढा याच्यावर भादवि कलम 363, 366, 376 सह लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम कलम 4, 8,12 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
सदर गुन्ह्यामध्ये आरोपी शंभूराजे पवार यास पोलिसांनी दिनांक 14 एप्रिल 2023 रोजी अटक केलेली होती. तदनंतर यातील आरोपी याने अॕड निखिल पाटील यांचे मार्फत जामीन मिळणे कामी बार्शी येथील सत्र न्यायालयात धाव घेतली होती सदर जामीन अर्जाची सुनावणी बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश मा. श्री जे.सी.जगदाळे साहेब यांचे समोर झाली सदर सुनावणी वेळी आरोपीचे वकील अॕड निखिल पाटील यांनी त्यांचे युक्तिवादात सदरची युवती ही जवळपास 18 वर्षे वयाची असून तिला चांगले वाईट समजते तसेच ते स्वतःहून घर सोडून निघून गेले होते सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण होत आला असून आरोपी हा तपासात मदत करण्यास तयार आहे सदर गुन्ह्यात भादवि कलम 376 लागू होत नसून अत्याचार केल्या संबंधित कोणताही सक्षम पुरावा नसल्याचा युक्तिवाद केला सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी शंभूराजे अशोक पवार याची 50 हजार रुपयांच्या जातमुचुलक्यावर जामीनावर मुक्तता करण्यात आली.