करमाळा, दि. 4 (करमाळा-LIVE)-
बहुचर्चीत श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी सोपानराव टोपे यांनी तेरा अर्ज अपात्र ठरवण्यात आले होते, या निर्णयाविरुद्ध प्रा. रामदास झोळ यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर येथील प्रादेशिक सह संचालक (साखर) यांच्याकडे अपील दाखल केले होते. सोपानराव टोपे यांनी अवैध ठरवलेले अर्ज प्रादेशिक सहसंचालक राजकुमार दराडे यांनी अवैध ठरवले असून यामुळे बागल गटाला दिलासा मिळाला आहे.
या निवडणुकीत बागल गटाच्याविरुद्ध मकाई बचाव समितीच्या माध्यमातून प्रा. झोळ हे मोहिते-पाटील समर्थक जिल्हा परिषदेच्या सदस्या सविताराजे राजेभोसले उतरले आहे. प्राध्यापक रामदास झोळ यांचे सात अर्ज पात्र ठरलेले असून उर्वरित उमेदवारी अर्ज अपात्र झाले आहे. बागल गटामध्ये यामुळे आनंदाचे वातावरण पसरले असून फटाके ची आतिषबाजी करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
याबाबत मकाई बचाव समितीचे रामदास झोळ यांनी आपण मंजुर झालेल्या पात्र उमेदवारांना बरोबर घेऊन निवडणूक लढवणार असून अपात्र ठरलेल्या उमेदवारा बाबत उच्च न्यायालयात जाणार असून तेथे आपले अर्ज मंजूर झाल्यानंतर लढवणार असल्याची सांगितले.