करमाळा : महात्मा गांधी ज्युनियर कॉलेजच्या विज्ञान शाखेचा 99.39 टक्के निकाल
करमाळा, दि. 25 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील करमाळा तालुका एज्यूकेशन सोसायटीचे महात्मा गांधी ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स ९९.३९% निकाल लागला आहे.
तालुक्यात सर्वात जास्त ३३४ विद्यार्थ्यानी बोर्ड परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ३३२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते यामध्ये ३३० विद्यार्थी उत्कृष्ट गुण मिळवत उत्तीर्ण झाले आहेत. तब्बल १७ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथमश्रेणीत, ८४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १९६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ३३ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
कॉलेजमधून प्रणाली पोपट मोहोळकर ६०० पैकी ५५१ (९१.८३%) प्रथम आली असून द्वितीय क्रमांक सिमरन अय्युब सय्यद ६०० पैकी ४४९ (९१.५०%) तर तृतीय क्रमांक मयुर प्रविण महिंद्रकर ६०० पैकी ५४६ (९१.००%) आला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार जयवंतराव जगताप, विश्वस्त माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, विश्वस्त शंभूराजे जगताप, प्राचार्य पी.ए कापले, उपप्राचार्य बागवान सर, पर्यवेक्षक एस.टी. शिंदे, बी.के. पाटील, विभाग प्रमूख व्ही. एल. पवार सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदिंनी अभिनंदन केले आहे.