महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकाॕम सेनेच्या राज्य चिटणीस पदी साडे येथील विजय रोकडे यांची निवड

जेऊर, दि. 9 (करमाळा-LIVE)-
मनसे टेलिकाॕम सेनेच्या राज्य चिटणीस पदी करमाळा तालुक्यातील साडे येथील विजय रोकडे यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनेचे अध्यक्ष सतीश नारकर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनेचे सरचिटणीस निर्मल निगडे याच्या सहकाऱ्याने साडे येथील विजय रोकडे यांची महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनेच्या महाराष्ट्र राज्य चिटणीस पदी निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र त्यांना देण्यात आले.

