October 9, 2026

जेऊरचे ग्रामदैवत श्री खंडोबा देवस्थानची आज यात्रा- रात्री 12 वाजता निघणार भव्य छबिणा तर सोमवारी भव्य कुस्ती मैदान

0
IMG-20230409-WA0019.jpg

जेऊर, दि. 9 (करमाळा-LIVE)-
शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या करमाळा तालुक्यातील जेऊर येथील ग्रामदैवत श्री म्हाळसाकंत खंडोबा देवस्थानची यात्रा आज रविवारी 9 एप्रिलला भरणार असून रात्री बारा वाजता ‘यळकोट यळकोट जय मल्हार, “देवाच्या घोड्याच चांगभलं’ म्हणत भव्य छबिणा निघणार आहे. तर सोमवारी 10 एप्रिलला जरवर्षी प्रमाणे भव्य कुस्ती मैदान भरणार आहे.

यात्रा धार्मिक विधी वेळापत्रक-
रविवार 9 एप्रिल-
1) पहाटे- 6.00 वाजता श्री खंडोबा देव यांचा अभिषेक (राजाभाऊ जगताप-मानकरी यांच्या हस्ते)
2) दुपारी- 12 ते 3 वाजेपर्यंत देव बांधणे कार्यक्रम श्री खंडोबा देवस्थानचे गुरव श्री संजय गुरव यांच्या शिक्षक कॉलनी येथील घरी)
3) संध्याकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत ग्रामस्थांना दर्शन (शिक्षक कॉलनी येथे)
4) रात्री 10 वाजता शिक्षक कॉलनी येथील श्री गुरव यांच्या घरातून श्री विठ्ठल मंदिर येथे देवाचे आगमन
5) श्री खंडोबा आणि त्यांचे वाहन अश्व यांची पारंपरिक पध्दतीने आरती.
6) रात्री 12 वाजता (सोमवार) श्री खंडोबा आणि म्हाळसा यांचा विवाह सोहळा संपन्न होणार
7) विवाह सोहळ्यानंतर रात्री 12 वाजता भव्य छबिणा- श्री खंडोबा मंदिर ते बाजारतळ
8) रात्री 1.00 ते 1.30 वाजण्याच्या दरम्यान शोभेची दारू उडविणे बाजारतळ येथे.
9) रात्री 1.30 ते पहाटे पर्यंत बाजारतळ ते एसटी स्टँड येथील मारूती मंदिर पर्यंत मिरवणूक
10) स्टँड पासून रिटर्न पहाटे 5 वाजता विठ्ठल मंदिर येथे आगमन.
11) पहाटे 6.00 वाजता श्री खंडोबा मंदिरात देव आणि अश्व यांचे आगमन आणि आरती.
12) सोमवारी भव्य कुस्ती मैदान महादेव मंदिर येथे.

जेऊरच्या या परंपरागत छबिण्यास खांदेकरी व इतर देवकार्य पार पाढण्यासाठी सध्या सरकारी सेवेत काम करणारे महाराष्ट्र पोलीस, पोलीस इन्स्पेक्टर, सेल्स टॅक्स इंस्पेक्टर, रेल्वे पोलीस, ग्रामविकास अधिकारी असे उच्च पदस्थ व्यक्ती आपली सेवा बजावतात.

व्हिडीओ सौजन्य- श्री सिध्दिविनायक जाधव, ओम कॉम्प्यूटर, जेऊर

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page