राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या करमाळा तालुकाध्यक्ष पदी आदित्य जगताप यांची निवड
करमाळा, दि. 28 (करमाळा-LIVE)-
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या विचाराने संपूर्ण महाराष्ट्र प्रेरित झालेला आहे असे मत सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सागर पडगळ यांनी व्यक्त केले ते करमाळा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस भवन दत्तपेठ येथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस करमाळा तालुकाध्यक्षपदी आदित्य नितीन जगताप यांना नियुक्तीपत्र देऊन निवड जाहीर केली.
शेतकरी, कामगार, विद्यार्थी यांना नेहमीच त्यांनी पाठबळ दिलेले आहे राज्यात विद्यार्थ्यांच्या हितासाठी नेहमीच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आवाज उठवत आहे तसेच प्रशासनामध्ये विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी भाग पाडत आहे. राज्याच्या राजकारणात माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण तसेच देशाचे नेते मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचाराने करमाळ्यातील जगताप घराणे काम करत आहे त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेऊन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुक्यातील विद्यार्थी व युवकांसाठी सदैव कार्यरत राहणार यात काही शंका नाही यासाठी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस तसेच महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सदैव तुमच्या पाठीशी राहील असा आत्मविश्वास त्यांनी यावेळी दिला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा शहराध्यक्ष अॕड शिवराज जगताप, आझाद शेख, सयाजी रोकडे यांची भाषणे झाली. आदित्य जगताप हे माजी नगराध्यक्ष कै. हरिभाऊ जगताप यांचे नातू आहेत.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शहर उपाध्यक्ष आझाद शेख, केतनकुमार इंदुरे, शहर खजिनदार अरुण काका टांगडे, अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष राजू सय्यद, शहर सरचिटणीस समीर शेख, कर्मवीर अण्णासाहेब जगताप मित्र मंडळाचे उपाध्यक्ष प्रज्योत गांधी, नागेश राखुंडे, सादिक शेख, सुरज इंदूरे आदी जण उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सयाजी रोकडे, अथर्व बरडे, र्शिव राखुंडे, सम्राट कांबळे, अविष्कार गबाले, सुमित जिते, समाधान निकत, आकाश सातव, श्रेयस वीर, श्रेयश साखरे, विजय कांबळे, अतुल आलाट नजर कुरेशी, फारूक कुरेशी, राजू बसवंत आदी जण उपस्थित होते.
- रोजगार हमी योजनेतून सिंचन विहिरीच्या जाचक अटी शिथिल करा- भाजप जिल्हा सचिव लक्ष्मण केकान
- करमाळ्यात मराठा कुणबी प्रकरणासाठी अडवणूक ; ऐजंट आणि अधिकाऱ्यांमध्ये मिलीभगत- युवासेनेचा धरणे आंदोलनाचा इशारा
- भाळवणीच्या तृप्ती वाघमारे चे नीट (NEET) परीक्षेत घवघवीत यश
- कुंभेजच्या बागल विद्यालयात केंद्रस्तरीय क्रिडा स्पर्धांचे आयोजन
- २०१४ ला २५७ चा मटका नव्हता, जनतेचा कौल होता! हे २०२४ लाही जनतेने दाखवून दिले ; विरोधकांना पाटील गटाचा “हाबाडा”