पाथुर्डी येथे तीन दिवसीय अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन


करमाळा, दि. 16 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील पाथुर्डी येथे श्री सद्गुरु संत बाळू मामा मूर्ती स्थापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त तीन दिवसीय अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दि. 17 डिसेंबर ते मंगळवार दि.19 डिसेंबर कालावधीत सप्ताह संपन्न होणार आहे. या सप्ताहानिमित्त काकडा आरती, अमृतनुभव पारायण, हरिपाठ, भोजन, हरिकिर्तन, हरिजागर हे दैनंदिन कार्यक्रम असणार आहेत.
रविवारी ह.भ.प अक्षय महाराज शेळके यांचे किर्तन संध्याकाळी 8 ते 10 या वेळेत होणार असून सोमवारी ह.भ.प. जालिंदर महाराज वाघमोडे यांचे संध्याकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत कीर्तन होणार आहे. तर मंगळवारी ह.भ.प. विठ्ठल महाराज गहिनीनाथगड यांचे सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत काल्याचे कीर्तन नंतर मूर्तीवर पुष्पवर्षाव व आरतीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन पाथुर्डी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. समस्त ग्रामस्थ पाथुर्डी यांच्यावतीने या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.


- वैष्णवी, सुचिता अन् रोहित यांची पोलिस दलात निवड ; तिघांचा कुंभेज येथे सन्मान
- श्री.वटवृक्ष मंदिरात स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या धर्मसंकीर्तन व्यासपीठाचे पूजन
- जेऊर येथे महिला दिन उत्साहात साजरा ; ‘हिरकणी’ स्पर्धेत अपेक्षा अवसरे यांचा प्रथम क्रमांक
- अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ रुग्णालयात होमिओपॅथिक शिबीर संपन्न
- आवाटी येथे सोमवारी हजरत बु ‘अलीशाह कलंदर रह पानीपत’ यांच्या स्मरणार्थ ‘उर्स कलंदर’ कार्यक्रमाचे आयोजन
