आमदार संजयमामा शिंदे यांचा करमाळा तालुक्यातील पश्चिम भागात झंझावती प्रचार ; गाव भेट दौऱ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद


करमाळा, दि. २७ (करमाळा-LIVE)-
माढा लोकसभेचे भाजप उमेदवार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आमदार संजयमामा शिंदे यांनी आज शनिवार दिनांक 27 एप्रिल रोजी करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागाच्या 22 गावांचा झंझावती प्रचार दौरा केला. या दौऱ्यास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
या गावभेट दरम्यान आमदार शिंदे यांनी पारेवाडी, केतूर नं.1, केतुर नं.2, पोमलवाडी, खातगाव, टाकळी, कोंढारचिंचोली, कात्रज, जिंती, रामवाडी, कावळवाडी, भिलारवाडी, कुंभारगाव, हिंगणी, गुलमोहरवाडी, भगतवाडी, दिवेगव्हाण, सावडी, कोर्टी, विहाळ, वीट या गावांना भेट देऊन गावाच्या विकासासाठी मतदारांनी महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना मतदान करण्याचे आवाहन केले.
सकाळी 8 वाजता पारेवाडी येथून या दौऱ्यास सुरुवात झाली व या दौऱ्याचा समारोप रात्री वीट येथे झाला. या गाव भेट दौऱ्यात आमदार संजयमामा शिंदे यांचे बरोबर पश्चिम भागातील सूर्यकांत पाटील, डॉ गोरख गुळवे, सुहास गलांडे, अॕड.अजित विघ्ने, बाळकृष्ण सोनवणे, तानाजी झोळ, राजेंद्र धांडे, सुजित बागल, राजेंद्र बाबर, हनुमंत पाटील, शंकर जाधव, बी एन जाधव, एड.अशोक गिरंजे, अनिल शेजाळ, सरपंच पांडुरंग नवले, गणेश गुंडगिरी, सरपंच अविनाश मोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक औदुंबर मोरे, सरपंच गौरव झांजुर्णे, रयत क्रांती जिल्हाध्यक्ष संतोष वारगड, अजित रणदिवे आदी उपस्थित होते.




