October 11, 2026

करमाळा नगरपालिकेच्या शाळेतील अनन्या पवार एटीएस (ATS) परीक्षेत जिल्ह्यात प्रथम

0
IMG-20240427-WA0053.jpg

करमाळा, दि. २७ (करमाळा-LIVE)-
करमाळा नगरपालिकेच्या शाळेतील अनन्या पवार हिचे एटीएस (ATS) परीक्षेत यश मिळविले आहे.

फेब्रुवारी 2024 मधे घेण्यात आलेल्या एटीएस प्रज्ञाशोध परीक्षेत इयत्ता पहिलीमधे शिकणाऱ्या अनन्या जयेश पवार हिचा राज्यात चौथा तर जिल्ह्यात प्रथम क्रमांक आलेला आहे.

कु. अनन्या पवार ही कै. साधनाबाई नामदेवराव जगताप प्राथमिक शाळा मुली क्रमांक-1, ची विद्यार्थिनी असून तिला तिच्या वर्गशिक्षिका पिसे मॅडम व मुख्याध्यापक दयानंद चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.

नगरपालिकांच्या शाळांचा दर्जा व गुणवत्ता सुधारत असून चांगल्या दर्जाचे सर्वांगीण शिक्षण दिले जात असल्याचे हे यावरून दिसून येते. या यशाबद्दल अनन्या चे सर्वत्र कौतुक होत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page