08/06/2025

जिजाऊ रथयात्रा उद्या कुर्डूवाडीत येणार ; करमाळ्यातून हजारो बांधव स्वागतासाठी जाणार

0
IMG-20250323-WA0015.jpg

करमाळा, दि. २३ (करमाळा-LIVE)-
उद्या राजमाता जिजाऊ रथयात्रा कुर्डूवाडीत येणार असून करमाळा तालुक्यातून हजारो बांधव स्वागतासाठी जाणार आहेत.

जेऊर येथे संभाजी ब्रिगेड संपर्क कार्यालय मध्ये जिजाऊ रथयात्रेच्या नियोजनार्थ विचार विनिमय बैठक संपन्न झाली. मराठा सेवा संघाच्यावतीने मराठा जोडो अभियान राबवण्यात येत असून, या निमित्ताने जिजाऊ रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांच्या संकल्पनेतून ही रथयात्रा काढण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यात ही रथयात्रा तीन दिवस असणार आहे.

मराठा सेवा संघाच्यावतीने राज्यभरातील मराठा समाजबांधवांना एकत्रित करण्यासाठी मराठा जोडो अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठीच १८ मार्च रोजी शहाजी महाराजांच्या जन्मदिनी वेरुळ येथील भोसले गढी येथून जिजाऊ रथयात्रेचा प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्रदिनी १ मे रोजी लाल महाल पुणे येथे या रथयात्रेची सांगता होणार आहे.

कोल्हापुरातून सांगलीमार्गे २३ मार्च रोजी रविवारी सांगोला येथे रथयात्रेचे आगमन होणार आहे. तेथून ती पंढरपूर येथे मुक्कामी असेल. २४ मार्च रोजी सोमवारी पंढरपूरहून अकलूज टेंभुर्णीमार्गे कुईवाडी येथे येईल. आणि तेथेच मुक्कामी असेल. २५ मार्च रोजी मंगळवारी कुर्डूवाडी-माढा-मोहोळ मार्गे सोलापुरात येईल.
मंगळवारी रथयात्रेचे पुणे नाक्यावरील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याजवळ आगमन होईल.

छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर ही रथयात्रा सोलापूर शहरात प्रवेश करील.

कुर्डूवाडी मध्ये स्वागत व जाहीर सभा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
वार- सोमवार
दिनांक- २४ मार्च २०२५
वेळ- सायंकाळी ५:३० वाजता स्थळ- गावदेवी मंदिर, कुर्डूवाडी

यावेळी जाहीर सभेचे ठिकाण आयोजन करण्यात आलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सभा होणार आहे तसेच रथयात्रेच्या स्वागताची जंगी तयारी सुरू असून. या सभेला करमाळा तालुक्यातून बहुसंख्य कार्यकर्ते व समाज बांधव कुर्डूवाडी येथे हजर राहणार आहेत.

यावेळी उपस्थित पुणे विभागीय कार्याध्यक्ष नितीन खटके मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष सचिन काळे, बाळासाहेब झोळ, तालुकाध्यक्ष सुहास पोळ, निलेश पाटील, शहराध्यक्ष अतुल निर्मळ, गणेश कुकडे, संदीप रोडगे, भीमराव लोंढे, सोमनाथ रोकडे, रमाकांत गटकळ, पांडुरंग घाडगे, आदिनाथ माने, सागर साखरे, नाना पोळ, पिंटू जाधव, सागर बनकर, सागर कोठावळे, अजित उपाध्ये, बाळासाहेब तोरमल आदी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page