17/12/2024

पाच कोटी रुपये मंजूर असलेल्या राजुरी-वाशिंबे या रस्त्याची अशी अवस्था असेल तर… डिकसळ पुलाच्या पन्नास कोटी कामाची काय अवस्था होईल सर्वसामान्य जनतेत चालू सलेली कुजबुज..”

0
IMG_20230525_095643.jpg

करमाळा, दि. 25 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील राजुरी ते वाशिंबे रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे झाले असून पाच कोटी रूपये मंजूर असल्याले रस्त्याचे असे हाल आहेत तर पन्नास कोटी मंजूर असलेल्या डिकसळ पुलाचे काय होईल अशा प्रकारची पोस्ट आणि व्हिडीओ करमाळा तालुक्यातील सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झालेली आहे.

व्हायरल झालेली पोस्ट आणि व्हिडीओ पुढीलप्रमाणे-

आमदारकीच्या 4 वर्षाच्या कार्यकाळात पश्चिम भागातील पाहिलंच राजुरी ते वाशिंबे ता.करमाळा येथील काम ते पण निकृष्ट दर्जाच…चालू असलेल काम ग्रामस्थांनी केलं उघड.
“पाच कोटी रुपये मंजूर असलेल्या राजुरी-वाशिंबे या रस्त्याची अशी अवस्था असेल तर… डिकसळ पुलाच्या पन्नास कोटी कामाची काय अवस्था होईल सर्वसामान्य जनतेत चालू आसलेली कुजबुज..”
कालपासून वाशिंबे ते राजुरी या रस्त्याचा निकृष्ट दर्जाचे झालेल्या कामाचा व्हिडीओ सोशियल मीडियावर त्या भागातील ग्रामस्थांनी उघडकीस पडला व तो सर्व तालुक्यातील जनतेने पाहिला आहे.त्या कामाची प्रशासकीय मंजुरी जवळपास पाच-साडेपाच कोटीची आसलेली भागातील जनता बोलत आहे.तसेच त्या रस्त्याचे अंतरही साधारण अंदाजे पाच किलोमीटर पर्यंत असून प्रति किलोमीटर एक कोटी एवढी रक्कम मंजूर झाली असून सुद्धा जर अशी कामे होतं असतील तर करमाळा मतदारसंघाच यापेक्षा वाईट दुर्दैव काय..
“एका बाजूला डिकसळ पुलाच्या कामासाठी पन्नास-पंचावन्न कोटी मंजूर झाले म्हणून सहा महिन्यांपासून हवेत वावड्या उडवणारे मंडळी जर पाच कोटींची कामे अशी दर्जेदार करत असतील तर पन्नास कोटी कामांची काय अवस्था करतील याची भीती सर्वसामान्य जनतेला भेडसावत आसलेली चर्चा सध्या जनमाणसात कुजबुजलेली ऐकायला मिळत आहे.”
आपल्या मतदारसंघात चालू असलेल्या कामावर,तो कोणी काम करणारा ठेकेदार असेल.त्या ठेकेदारावर लक्ष आसन गरजेचं असताना नेमके प्रतिनिधी लक्ष ठेवतात तरी कशावर हा प्रश्न जनतेला न सुटणारा आहे.
“श्री.नारायण(आबा)गोविंदराव पाटील 2014-2019 या कालावधी मध्ये आमदार असताना त्यांनी केलेल्या पश्चिम भागातील(तालुक्यातील कामांचा हिशोब सोडून)कामांची तुलना केली तर जवळपास पाचशे-साडेपाचशे कोटींची कामे फक्त जिल्हा परिषद कोर्टी गटात म्हणजेच पश्चिम भागात मंजूर केली व त्यातील शंभर टक्के कामे पूर्ण ही झाली.”(कोणा भक्तांना पश्चिम भागातील पाचशे-साडेपाचशे कोटी कामांचा हिशोब पाहिजे असेल तर त्यांनी वयक्तिक नंबर संपर्क साधावा आपलं समाधान केलं जाईल.)”श्री. नारायण(आबा)पाटील यांच्या कारकिर्दीत अगदी उत्तम अशी दर्जेदार झालेली कामे सर्व मतदारसंघातील जनतेने पाहिली आहेत.व आजही पहात आहेत.”
विशेष म्हणजे 2019 ते आजपर्यंत पूर्ण पश्चिम भागासाठी राजुरी-वाशिंबे भागात एवढाच एक रस्ता पाच कोटी रुपये मंजूर झालेला आहे.व त्या चालू असलेल्या रस्त्याचे काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे चालू असलेल त्या भागातील जनता बोलत आहे.मग प्रश्न आसा पडतो या कामाचा ठेकेदार देशात नावाजलेला असताना इतक्या वाईट आवस्थेचे जर काम करत असेल तर सर्व प्रथम त्या ठेकेदारावर कारवाई करणे गरजेचं आहे.त्यानंतर त्या रस्त्याच्या कामावर नेमलेल्या प्रशासकीय अधिकारी याची सुद्धा कसून चौकशी होणं गरजेचं आहे. जनतेचे कोट्यावधी रुपये मातीमोल मातीत मिसळण्याचा अधिकार यांना दिलाच कोणी त्यामुळे ठेकेदार असो, प्रशासकीय अधिकारी असो किंवा यांना पाठीशी घालणारे कोणी पुढारी असो यांच्यावर योग्य ती कार्यवाही झाली पाहिजे अन्यथा येणाऱ्या काळात हीच जनता तुमच्यावर कार्यवाही केल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की.
“म्हणून माझी भविष्यात मतदारसंघात होणाऱ्या कामांवर जर आपण लक्ष दिल नाही तर येणाऱ्या काळात आपल्या मतदारसंघाच वाटोळं ही मंडळी केल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की…कळाचे आपलाच पश्चिम भागातील चार वर्षात विकास पाहायला मिळालेला एक शेतकरी…”

राजुरी ते वाशिंबे रस्त्याचा व्हायरल व्हिडीओ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page