सालसे : महापुरुषांचा आदर्श मनामध्ये ठेवून विद्यार्थ्यांनी आपले व्यक्तिमत्व घडवावे- संपत गारगोटे


सालसे, दि. 30 (करमाळा-LIVE)-
सालसे येथील न्यू यशवंत प्रसारक शिक्षक मंडळ संचलित लालबहादूर शास्त्री विद्यालयाचे संस्थापक चेअरमन स्व नामदेव रघुनाथ सपकाळ व संस्थापकीय सचिव स्व आदिनाथ नायकुडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रा.संपत गारगोटे यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या जीवन चरित्र समजून सांगून या महापुरुषांच्या जीवनाचा विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात आदर्श घेऊन आपलं जीवन समृद्ध होऊ शकते हे पटवुन सांगितले. आज ज्ञानाचे युग आहे आणि म्हणून विविध शाखांचा अभ्यास करून ज्ञानवान व गुणवान व्हावं त्यातूनच आपल्या कुटुंबाचे आणि स्वतःचे स्वप्न पूर्ण होऊ शकते तसेच आज शालेय विद्यार्थी देखील सोशल मीडियाचा प्रचंड वापर करताना दिसतो त्यामुळे त्यांचे अभ्यासकडे दुर्लक्ष होत आहे. जर आपल्याला जीवनात यशस्वी व्यक्ती व्हायचं असेल आपले व्यक्तिमत्व घडवायचं असेल तर सोशल मीडियापासून शालेय जीवनात थोडं दूर राहून पुस्तकाचं वाचन करून ज्ञानार्जन करावे असा आव्हान त्यांनी केले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, सरसेनापती हंबीरराव मोहिते, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व अनेक महापुरुषांचे दाखले देऊन विद्यार्थ्यांचे प्रबोधन करून त्यांच्यामध्ये नव विचारांची चेतना जागृत करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष नितीन खटके, संस्थेचे सचिव रविंद्र सपकाळ, मुख्याध्यापिका तनपुरे मॅडम, सामाजिक कार्यकर्ते लहू येवले, उद्योजक शरद पवार, तंटामुक्तीचे अध्यक्ष वैभव घाडगे तसेच अनेक शिक्षक वृंद व अनेक विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी या कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी प्रिय शिक्षक व यश क्लासेसचे सर्वेसर्वा तानाजी लोकरे सर यांनी केले होते.
- भारत प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनविले आकाश कंदील व भेटकार्ड
- सोलापूर सामाजिक वनीकरण विभागाकडुन आयोजित स्पर्धेत जेऊरच्या भारत हायस्कूलची आरूषी बादल प्रथम तर शिवानी कुंभार तृतीय
- स्वतःचा कारखाना विकणाऱ्या माजी आमदार शिंदे आणि त्यांच्या गटाने आदिनाथची काळजी करू नये- पाटील गट
- जेऊर येथील ओंकार पोळ याचे प्रथम पुण्यस्मरण ; केम व शेटफळ येथे विद्यार्थ्यांना भोजन व शालेय साहित्यांचे वाटप
- कोर्टीच्या सरपंच भाग्यश्री नाळे-मेहेर यांना ग्रामररत्न सरपंच पुरस्कार जाहीर


