वाहनांचा वेग वाढल्याने, अपघातांचे प्रमाण वाढले ; वाहतूकीचे नियम पाठ्यपुस्तकात आणण्याची गरज
जेऊर, दि. २५ (गौरव मोरे)–
सध्याच्या धावपळीच्या युगात दळणवळणाची म्हणजेच वाहतूकीची खूप जास्त प्रमाणात वाढ होत आहे. वाहतूकीची संख्या वाढली परंतु नियम मात्र धाब्यावर बसविले जात आहेत. रस्ते चांगले होत असताना वाहनांच्या वेगावर नियंत्रण नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून याला जबाबदार कोण?? “सरकार की वाहतूक नियंत्रक”??
भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७६ वर्षे झाली आहेत. गेल्या ७६ वर्षात वाहतूकीमध्ये कमालीचा बदल घडताना दिसत आहे.
दळणवळणाची साधने वाढलेली आहेत, चौपदरी-सहापदरी अशा प्रकाराचे रस्ते सध्या आपल्याला पहायला मिळत आहेत. परंतु वाढत्या वाहतूकीची संख्या पाहता वाहन चालकांकडून नियमांचे पालन मात्र धाब्यावर बसविले गेलेले आहे. वाहतूकीचे नियम न पाळल्यामुळे तसेच वेगावर नियंत्रण नसल्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे.
वाहन चालविणाऱ्या मध्ये शाळकरी मुला-मुलींचे प्रमाण वाढले आहे. वाहतूकीचे नियम माहिती नसल्यामुळे सध्याची तरूणाई वाहन चालविताना वेग नियंत्रणात ठेवून चालवत नसल्यामुळे अपघातांची संख्या वाढलेली आहे.
यासाठी वाहतूकीचे नियम पाठ्यपुस्तकात येणे गरजाचे आहे. पाठ्यपुस्तकात वाहतूकीचे नियम असे धडे ठेवले तर शाळकरी वयात असताना मुला-मुलींना वाहतूकीचे नियम माहिती होतील. तसे पहायला गेले तर वाहतूकीचे नियम तसे खूप प्रमाणात आहेत, जवळजवळ वाहतूकीचे नियम पाहिले तर मुख्य ३३ नियम आहेत. सर्व नियम एकदाच लक्षात ठेवणे कठीण आहे परंतु पाठ्यपुस्तकात प्रत्येक वर्षी एक धडा आणल्यास त्याचा फायदा येणाऱ्या नवीन पिढीला नक्कीच होईल.
लहान मुलांचे वाहन चालविण्याचे प्रमाण वाढले-
सध्या शहरांमध्ये तसेच ग्रामीण भागात लहान मुलांचा वाहन चालविण्याचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे, शाळेला, फिरायला खूप प्रमाणात दुचाकी चा वापर केला जातो, परंतु वाहतूकीचे नियम माहित नसल्यामुळे त्यांच्याकडून नियम मोडले जात आहेत.
नियमांचे पालन होईल-
वाहतूकीचे नियमांचे धडे जर शालेय पाठ्यपुस्तकात आणले तर येणाऱ्या नविन पिढीकडून याचे पालन होईल, प्रत्येक लहान मुलांना नियम माहिती होतील, तसेच नियमांचे पालन झाल्यास आगामी काळात वाहतूकीची कोंडी तसेच अपघात कमी होतील.
पाचवी पासून पाठ्यपुस्तकात धडे आणण्याची गरज-
सध्यातरी आपल्या देशात पाचवी- सहावी ची मुले-मुली सर्रास दुचाकीचा वापर करतात, जर इयत्ता पाचवी पासून बारावी पर्यंत प्रत्येक वर्षी एक धडा पाठ्यपुस्तकात आणला तर वाहतूकीचे नियम मुलांना लहानपणापासून माहित होतील.
शिक्षण मंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज.
राज्याचे शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, जर वाहतूकीचे नियम पाठ्यपुस्तकात आले तर याचा फायदा येणाऱ्या नविन पिढीला नक्की होईल.
एकूण ३३ मुख्य नियम–
मोटार वाहन कायद्याच्या कलम ११८ नुसार केंद्र सरकारला भारतातील रस्त्यांवर मोटार वाहन चालवताना काय नियम असावे हे ठरवण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यानुसार दिनांक १ जुल १९८९ पासून रुल्स ऑफ रोड रेग्युलेशन लागू करण्यात आलेले आहेत. यामध्ये एकूण ३३ मुख्य नियम आहेत.