करमाळ्याच्या त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लबचे विभागीय मल्लखांब स्पर्धेत घवघवीत यश


करमाळा, दि. 5 (करमाळा-LIVE)-
क्रीडा व युवक सेवा संचनालय पुणे यांच्या अंतर्गत कन्वमुनी विद्यालय कंदर येथे घेण्यात आलेल्या शालेय पुणे विभागीय मल्लखांब स्पर्धेत पुणे विभागातून विविध जिल्हातुन 250 मल्लखांब खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. त्यात करमाळ्याच्या त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब करमाळा च्या खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. 19 वर्षाखालील मुलीच्या गटात संयुक्ता संतोष सोनके हिने दुसरा क्रमांक मिळवला तर 17 वर्षाखालील मुलींच्या गटात साक्षी ईश्वर खुळे हिने चतुर्थ क्रमांक मिळवला असून 19 वर्षाखालील मुलांच्या गटात गोरक्ष नाथा लोंढे याने पाचवा क्रमांक मिळवला आहे.
त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब करमाळाचे मल्लखांब मुख्यप्रक्षिशक सागर शिरस्कर, सानिका भगत, अजय बालशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 2 वर्षे झाली मल्लखांब चा सराव करीत होते वरील सर्व खेळाडूंना करमाळा तालुका क्रीडा अधिकारी तानाजी मोरे यांचे विशेष अभिनंदन केले.
या स्पर्धेतून पुढे सांगली येथे 11 जानेवारी पासून चालू होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेसाठी पुणे विभागाचा मल्लखांबच्या संघाची निवड करण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन तालुका क्रीडा अधिकारी तानाजी मोरे तसेच सुनील भांगे यांच्या हस्ते झाले. स्पर्धेसाठी सोलापूर जिल्हाचे राष्ट्रीय पंच बाळासाहेब शिंदे, मोहन झुंजे पाटील यांनी सहाय्य केले. तसेच सोलापूर जिल्हा मल्लखांब संघटनेचे सचिव पांडुरंग वाघमारे यांचे विशेष सहकार्य मार्गदर्शन लाभले.
