इंग्रजी विषयासाठी राज्यस्तरीय परिसंवादाचे आयोजन करणार- प्रा.गणेश करे-पाटील

करमाळा, दि. ५ (करमाळा-LIVE)-
इंग्रजी विषयासाठी राज्यस्तरीय परिसंवादाचे आयोजन करणार असल्याचे मत यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष प्रा.गणेश करे- पाटील यांनी व्यक्त केले आहे. सोलापूर जिल्हा इंग्रजी कार्यकारिणी सभा करमाळा येथे संपन्न त्यावेळी ते बोलत होते.
भविष्यातील आव्हानांवर मात करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी निर्माण होण्यासाठी शालेय वयापासून मातृभाषेसह इंग्रजीचे ज्ञान व भाषा कौशल्ये आवश्यक आहेत. त्या अनुषंगाने इंग्रजी शिक्षकांचे सक्षमीकण व्हावे यासाठी यशकल्याणी संस्था पुढाकार घेत असून आगामी शैक्षणिक वर्षात महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाबरोबर समन्वय साधून राष्ट्रीय पातळीवरील तज्ञ मार्गदर्शकांद्वारे इंग्रजी शिक्षकांसाठी विशेष परिसंवाद, चर्चासत्रे व उल्लेखनिय योगदान देणाऱ्या तज्ञ इंग्रजी शिक्षकांचा यश कल्याणी संस्थेच्या वतीने गुणगौरव करण्यात येईल असे प्रा.करे पाटील यांनी यावेळी जाहीर केले.
नुकतेच यशकल्याणी सेवाभवन येथे प्रा.करे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. गुरुनाथ मुचंडे यांचे अध्यक्षतेखाली व विद्यमान जिल्हाध्यक्ष प्रा.बाळकृष्ण लावंड, ब्रिटिश कौंसिल मेंटॉर प्रा. अशपाक काझी यांचे उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली.
या जिल्हास्तरीय बैठकीसाठी सोलापूर जिल्हा संघटनेचे सचिव धनाजी राऊत, जिल्हा उपाध्यक्ष आगतराव भोसले, आबासाहेब दाढे, शशीकांत चंदनशिवे जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष सचिव व महत्वाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी प्रा अशपाक काझी यांनी शिक्षक सक्षमीकरणासाठी एस.सी.आर.टी.ई शी समन्वय साधत विशेषज्ञांची मदत घेतली जाईल अशी ग्वाही दिली. अध्यक्ष प्रा.बाळकृष्ण लावंड म्हणाले की, यशकल्याणी संस्थेने प्राथमिक शाळांसाठी मोठे योगदान दिले आहे. तसेच माध्यमिक स्तरावर व्यापक प्रमाणावर लक्ष केंद्रित केलेले असून नजिकच्या काळात इंग्रजी विषयासाठी मोठे काम उभा राहील प्रा. मुचंडे अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, यशकल्याणी संस्थेने जिल्हयातील विद्यार्थी आणि इंग्रजी भाषा शिक्षकांसाठी मोठे योगदान दिलेले असून पूणे अभ्यास दौरा सारखे उपक्रम राबवून शिक्षकांना कार्य करण्याची नवी उर्जा मिळाली आहे.
यावेळी प्रा. भिष्मा चांदणे यांनी मौलिक विचार मांडत सभेत चैतन्य निर्माण केले. धनाजी राऊत, आगतराव भोसले, शशीकांत चंदनशिवे, आबा दाढे, किशोर शिंदे, गणेश यादव, प्रा.गोपाळकर, श्रीकांत सावंत, प्रमिला वाघमारे, महादेव पवार, असिफ तांबोळी, श्रीमंत राजेभोसले, नेताजी भोसले, प्रा. दांडगे, प्रा. जयेश पवार, प्रा.विष्णू शिंदे, अभियंता अतुल दाभाडे, प्रसिद्धी प्रमुख सुखदेव गिलविले, सचिव गोपाळराव पाटील, मारूती जाधव, श्रीराम शिंगटे, सुहास गलांडे, विजय गरड यादी उपस्थित होते.