सभासदांनी निवडणूक हातात घेतली आहे, आदिनाथवर संजीवनी पॕनलचीच सत्ता येणार ; विरोधकांचे पानिपत होणार- कार्यकर्त्यांचा विश्वास

करमाळा, दि. १५ (करमाळा-LIVE)-
करमाळा विधानसभेला जसे जनतेने निवडणूक हाती घेऊन आमदार नारायण आबा पाटील यांना विजयी करून सत्तांतर केले होते त्याच प्रमाणे आदिनाथ निवडणुकीतही सभासदांनी निवडणूक हाती घेतली असून या निवडणुकीत संजीवनी पॕनल विजयी होणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पाटील-शिंदे-झोळ यांच्यात जरी तिरंगी असली तरी मात्र पाटील-शिंदे यांच्यात दुरंगी लढत होत आहे. प्रचार अंतिम टप्प्यात असताना पाटील गटाला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे सध्यातरी शिंदे गट बॕकफुटवर दिसत असून झोळ गट निवडणुकीच्या शर्यतीत ही नाही अशी चर्चा सध्या होताना दिसत आहे.
या अगोदरच तालुक्यातील प्रमुख बागल-जगताप गटांनी माघार घेतलेली आहे. तर माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी संजीवनी पॕनलला पाठिंबा दिलेला आहे तर बागल यांची भुमिका अजूनही गुलदस्त्यात आहे.
विधानसभेला निवडून आल्यानंतर आमदार पाटील यांची ताकद वाढलेली पहायला मिळत आहे.