08/06/2025

आम्हाला हलक्यात घेऊन नका! म्हणणारे, विधानसभेला फुटलेला भाजप गट आदिनाथ निवडणुकीतही कागदावरच राहिला किंगमेकर!

0
IMG-20250419-WA0003.jpg

करमाळा, दि. १९ (करमाळा-LIVE)-
आम्हाला हलक्यात घेऊन नका! असे म्हणून ऐनवेळी महायुतीचा धर्म न पाळता अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांना पाठिंबा देणारे करमाळ्यातील भाजप गट विधानसभा बरोबर आदिनाथ निवडणुकीतही कागदावरच किंगमेकर राहिला.

विधानसभा निवडणुकीत १२ नोव्हेंबरला करमाळ्यातील पदाधिकाऱ्यांनी महायुती उमेदवार दिग्विजय बागल यांना साथ न देता अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांना पाठिंबा दिला. पाठिंबा दिल्यानंतर करमाळ्यात फुटलेला भाजप गट किंगमेकर होणार अशी चर्चा सुरू झाली मात्र ही चर्चा फोल ठरली मविआ चे उमेदवार नारायण आबा पाटील यांनी विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांचा पराभव करीत दुसऱ्यांदा विधानसभा गाठली. तर महायुतीचे उमेदवार दिग्विजय बागल हे तिसऱ्या नंबरवर राहिले.

त्यानंतर या फुटलेल्या भाजप गटाने पुन्हा भाजप मध्ये काम सुरू केले, आदिनाथ निवडणुकीत माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या पॕनलला पाठिंबा दिला खरा परंतु याचा काहीही फायदा झाला नाही.

त्यामुळं विधानसभेला फुटलेला भाजप गट आदिनाथ निवडणुकीतही कागदावरच किंगमेकर राहिला अशी चर्चा सुरू झालेली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page