08/06/2025

जेऊर व माढा रेल्वे स्टेशनवर ‘हुतात्मा एक्सप्रेसला’ लवकरात लवकर थांबा द्यावा प्रवासी संघटनांची मागणी

0
IMG-20250501-WA0038.jpg

जेऊर, दि. १ (करमाळा-LIVE)-
करमाळा, परंडा, जामखेड या तीन तालुक्यातील जवळपास २५० ते ३५० गावातील नागरिक जेऊर स्थानकावरून प्रवास करतात, दौंड, कुर्डूवाडी, पुणे, सोलापूर या शहरांच्या ठिकाणी जाणे व येण्यासाठी ही गाडी अत्यंत सोयीची आहे ही गाडी सोलापूर – पुणे – सोलापूर अशी २६४ किमी. अंतर धावते ही गाडी माढा व जेऊर स्थानकावरून सकाळी पुण्याच्या दिशेने जाताना व संध्याकाळी माघारी येताना खूप दळणवळणाच्या दृष्टिकोनातून सोयीची आहे, या गाडीला या दोन्ही स्थानकावर थांबा मंजूर झाल्यास ग्रामीण भागातील नागरिकांची दळणवळणाच्या दृष्टिकोनातून खूप सोय होणार आहे.

तसेच पुणे येथे शालेय शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना तसेच खाजगी व सरकारी कर्मचारी यांना कर्तव्यावर जाण्यासाठी व येण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना चांगली व आधुनिक आरोग्य सेवा घेण्यासाठी मोठ्या दवाखान्यांमध्ये जाणे व येण्यासाठी तसेच छोटे -मोठे व्यापारी आपला व्यवसाय करण्यासाठी व खरेदी विक्रीसाठी या गाडीचा उपयोग सकाळी जाताना व संध्याकाळी माघारी येताना या गाडीचा उपयोग करतील या सर्व अनुषंगाने ही गाडी जेऊर व माढा स्थानकावर थांबणे खूप गरजेचे आहे, अशी वारंवार मागणी प्रवासी संघटना तसेच ग्रामीण भागातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

या सर्व बाबींचा विचार करून गाडीचा थांबा मंजूर करण्यात यावा म्हणून सोलापूर विभाग रेल्वे सल्लागार समितीचे अध्यक्ष श्री संजय पाटील तसेच प्रवासी असोसिएशन जेऊर चे अध्यक्ष सुहास सुर्यवंशी व असोसिएशनचे सचिव प्रमोद जानकर यांच्या वतीने सोलापूर रेल्वे विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक श्री योगेश पाटील, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक जे.एन.गुप्ता व सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक सुदर्शन देशपांडे यांना भेटून निवेदन देण्यात आले.

यावेळी सर्व संबंधित अधिकारी यांनी सांगितले की आम्ही लवकरात लवकर या गाडीच्या थांब्याबाबत प्रस्ताव तयार करून वरिष्ठ कार्यालयाकडे योग्य त्या कार्यवाहीसाठी पाठवण्यात येईल.

तसेच दौंड – सोलापूर डेमो व दौंड – कलबुर्गी डेमो या गाडीला वाशिंबे स्थानकावर थांबा देण्यात यावा म्हणून संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले व संबंधित प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवू असे सांगण्यात आले.

ठळक मुद्दे-
१) गेल्या दहा वर्षापासून या गाडीला थांबा करण्याची मागणी. अनेक वेळा मोर्चे निघाले.
२) सोलापूर – पुणे, हुतात्मा इंटरसिटी ही प्रमुख जिल्ह्यांना जोडणारी गाडी.
३) हुतात्मा इंटरसिटी सोलापूर – पुणे असे २६४ किमी. अंतर धावते.
४) जेऊर व माढा स्थानकावर या गाडीला थांबा दिल्यास ग्रामीण भागाची नाळ पुणे व सोलापूर या शहरांशी जोडली जाणार.
५) या गाडीने शिक्षण,आरोग्य सेवा,व्यापार, नोकरी साठी पुणे येथे सकाळी जाऊन संध्याकाळी माघारी येणे शक्य.
६) या गाडीला जेऊर स्थानकावर थांबा मंजूर झाल्यास जेऊर ते पुणे असे १०० रुपयात बसून रिझर्वेशन मिळणार तसेच वातानुकूलित ३४० रुपयात रिझर्वेशन मिळणार.
७) या गाडीला थांबा झाल्यास जेऊर ते पुणे ७५० रुपयात मासिक पास काढून दररोज येणे जाणे शक्य होईल.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page