24/06/2025

कुंभेजच्या बागल विद्यालयात योग दिन उत्साहात साजरा

0
IMG-20250621-WA0019.jpg

करमाळा, दि. २१ (करमाळा-LIVE)-
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत शासनाच्या अधिसूचनेनुसार येथील दिगंबरराव बागल माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

मुखाध्यापक हनुमंत पाटील यांनी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय योगदिन आयोजनाचा हेतू व महत्व विषद करून या वर्षीची ‘योग फॉर वन अर्थ वन हेल्थ ‘ संकल्पना स्पष्ट केली.

क्रिडा विभागप्रमुख विष्णू पोळ यांनी विद्यार्थ्यांकडून योगासनांची प्रात्यक्षिके करवून घेतली तर कल्याणराव साळुंके यांनी अष्टांगयोगा बद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली व सूक्ष्म हालचालींचा व्यायाम व प्राणायामाचे प्रात्यक्षिकासह सादरीकरण केले.

आकांक्षा क्षीरसागर, सोहम सूर्वे, प्रशांत गायकवाड या विद्यार्थ्यांनी योगाचे महत्व जाणून घेत विद्यार्थ्यांसमोर प्रात्यक्षिके सादर केली.

याप्रसंगी मुख्याध्यापक हनुमंत पाटील, शिक्षक कल्याणराव साळुंके, सिताराम बनसोडे, संतोष शिंदे, विष्णू पोळ, दादा जाधव, बलभीम वाघमारे, किशोर कदम, संतोष घोरपडे, नंदकुमार कांबळे आदि उपस्थित होते.

नियमित सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्रअखेर विशेष सन्मान केला जाईल असे मुख्याध्यापकांनी जाहीर केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page