11/05/2026

कुंभेज येथील दिगंबरराव बागल विद्यालयाचा दहावीचा ९७.७२ टक्के निकाल

0
image_editor_output_image-663093750-1778432364650.jpg

कुंभेज, दि. १० (करमाळा-LIVE)-
कुंभेज येथील दिगंबरराव बागल माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावी (SSC) परीक्षेचा निकाल ९७.७२ टक्के लागला असून विद्यालयाने यशाची परंपरा कायम राखली आहे. एकूण ४४ विद्यार्थ्यांपैकी ४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

प्रिया महेश गुटाळ हीने ९२.८० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे तर प्रांजली दत्तात्रय भोसले या विद्यार्थिनीने ८६.४० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तसेच तेजस्विनी भाऊसाहेब कन्हेरे या विद्यार्थिनीने ८४.८० टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक प्राप्त केला असून तनुष्का सुनील शिंदे ८३.६० टक्के गुणांसह चौथा तर गायत्री उमेश कन्हेरे हीचा ८१.६० टक्के गुणांसह पाचवा क्रमांक आला आहे.

विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास, शिक्षकांचे मार्गदर्शन व पालकांच्या सहकार्याच्या बळावर हे यश संपादन केले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या यशाबद्दल मा. माजी आमदार श्यामल बागल, जिल्हा परिषद गटनेत्या तथा सदस्या रश्मी बागल, मकाई साखर कारखान्याचे माजी चेअरमन दिग्विजय बागल, यशकल्याणी संस्थेचे चेअरमन गणेश करे-पाटील, अक्कलकोट देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे, विश्वस्त भारतभाऊ शिंदे, अॕड. बाळासाहेब मुटके, मंत्रालय कक्ष अधीक्षक अजय साखरे, शासकीय अभियंता मधुकर सुर्वे, मेजर अक्रूर शिंदे, महावीर साळुंके, अण्णासाहेब साळुंके, अनिल कादगे, युवराज भोसले, बिभीषण कन्हेरे, अण्णासाहेब भोसले, यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

विद्यालयाच्या यशाच्या परंपरेचे कौतुक करीत मुख्याध्यापक हनुमंत पाटील यांचे अभिनंदन केले. शिक्षक कल्याणराव साळुंके, सीताराम बनसोडे, संतोष शिंदे, विष्णू पोळ दादा जाधव यांच्या कर्तव्याची प्रशंसा केली. व सेवक बलभीम वाघमारे, किशोर कदम, नंदकिशोर कांबळे, संतोष घोरपडे यांचे कौतुक केले.

आजी-माजी सैनिक संघटना, महाराष्ट्र गणेश मित्र मंडळ, जनसेवा नवरात्र मित्र मंडळ, शिवस्वराज्य प्रतिष्ठान, ज्योतिर्लिंग गणेश मित्र मंडळ, शिवराजे ग्रुप, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच, भीम आर्मी, छावा समूह आदी संघटनांसह कुंभेज व पोफळज गावचे सरपंच, उपसरपंच आणि शिक्षणप्रेमी ग्रामस्थांनी व माजी विद्यार्थी संघानेही यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page