आषाढी निमित्त जेऊर येथील भारत प्रायमरी आणि मॉन्टेसरीची बाल दिंडी

जेऊर, दि. २६ (करमाळा-LIVE)-
जेऊर येथील भारत प्रायमरी स्कूलची बालदिंडी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यामध्ये सामाजिक संदेश देत या दिंडीचा उत्साह संपन्न झाला. भक्ती भाव, सेवाभावाचा संदेश समता तसेच विविध संदेश, समता, समानता, संस्कृती परंपरा आणि शिक्षणाचे महत्व यांचा सामाजिक संदेश देत अतिशय उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये संपन्न झाली.
विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली बनवलेली विठुरायाची पालखी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण होती, विद्यार्थ्यांनी हातामध्ये सामाजिक संदेश घेतलेले बॅनर या पालखी सोहळ्याचे वैशिष्ट्ये व प्रमुख आकर्षण ठरले. यावेळी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्या हातामध्ये सामाजिक संदेश लिहिलेले होते. त्याच्यामध्ये स्वच्छता, शिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन अशा विविध प्रकारचे संदेश लिहिलेले बॅनर होते. या बालदिंडी सोहळ्यामध्ये गावातील ग्रामस्थ पालक व सर्व विद्यार्थी व शाळेतील सर्व शिक्षक सहभागी झाले होते ही दिंडी अतिशय भक्तीमय वातावरणात बालदिंडी सोहळा संपन्न झाली.
यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षक अनिता देशमुख व अंगद पठाडे यांचे तर्फे जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.
सुरुवातीला दिंडीची सुरुवात संस्थेचे सचिव अर्जून सरक यांच्या हस्ते दिंडीची पुजा करून सुरुवात झाली. यावेळी हायस्कूलचे प्राचार्य गोकुळ पाटील, पर्यवेक्षक रविकिरण वाघमोडे हे उपस्थित होते. दिंडी संपूर्ण जेऊर मध्ये हरिनामाचा गजर करत जाऊन आली यावेळी गावातील ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले, प्रतिष्ठित व्यापारी संजयकुमार दोशी यांनी विद्यार्थ्यांना खाऊ दिला. यावेळेस संस्थेचे उपाध्यक्ष संजयकुमार दोशी यांनी दिंडीचे स्वागत केले. तसेच अजयकुमार सोळंकी यांनीही विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले.
यावेळी भक्ती गीतांचा कार्यक्रम आयोजित केला गेला.
यावेळी विद्यार्थ्यांनी भक्ती गीतावर आपले नृत्य सादर केले विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली बनवलेली विठुरायाची पालखी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण होती, विद्यार्थ्यांनी हातामध्ये सामाजिक संदेश घेतलेले बॅनर या पालखी सोहळ्याचे वैशिष्ट्ये व प्रमुख आकर्षण ठरले.
यावेळी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्या हातामध्ये सामाजिक संदेश लिहिलेले होते त्याच्यामध्ये स्वच्छता, शिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन अशा विविध प्रकारचे संदेश लिहिलेले बॅनर होते. दिंडीसाठी विद्यार्थ्यांनी खास वारकऱ्यांचे गणवेश धारण केले होते मुलांनी पांढरा गणवेश पांढरा शर्ट पांढरी विजार तर मुलींनी साड्या परिधान केल्या होत्या.
यामुळे याचे खूपच कौतुक झाले. या बालदिंडी सोहळ्यामध्ये गावातील ग्रामस्थ पालक व सर्व विद्यार्थी व शाळेतील सर्व शिक्षक सहभागी झाले होते ही दिंडी अतिशय भक्तीमय वातावरणात बालदिंडी सोहळा संपन्न झाली. यावेळी प्राचार्य गोकुळ पाटील व पर्यवेक्षक रविराज वाघमोडे उपस्थित होते. दिंडी संपूर्ण जेऊर मध्ये हरिनामाचा गजर करत जाऊन आली.
बाल दिंडीचे योग्य नियोजन केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार नारायण आबा पाटील, उपाध्यक्ष अनिलकुमार गादिया, संस्थेचे सचिव अर्जून सरक, संस्थेचे संचालक पृथ्वीराज पाटील या सर्वांनी अभिनंदन केले.



