November 23, 2026

स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने लोकसेवेच्या कार्याला नवी दिशा व बळ मिळते- युवानेते दिग्विजय बागल

0
IMG-20261123-WA0002.jpg

आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी, राजन मालक पाटील, दीपक आबा साळुंखे, बबनराव शिंदे यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील मान्यवर नेत्यांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन

अक्कलकोट, दि. २२ (करमाळा-LIVE)-

सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित नेतेमंडळींनी एकत्रितपणे अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानास सदिच्छा भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे मनोभावे दर्शन घेतले. या भक्तिमय भेटीमुळे मंदिर परिसरात उत्साहपूर्ण आणि प्रसन्न वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी माजी आमदार राजन मालक पाटील, आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी, माजी आमदार दीपक आबा साळुंखे, सुरेश हसापुरे, रणजित भैय्या शिंदे, दिग्विजय भैय्या बागल, माजी आमदार बबनराव शिंदे, प्रणव परिचारक यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन तथा नगरसेवक महेश मालक इंगळे आणि प्रथमेश मालक इंगळे यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद व श्री स्वामी समर्थांची प्रतिमा देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

यावेळी भाजपा नेते दिग्विजय भैय्या बागल यांनी स्वामी दर्शनानंतर लोकसेवेच्या कार्यातील आध्यात्मिक प्रेरणेचे महत्त्व अधोरेखित करताना, “स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने लोकसेवेच्या कार्याला नवी दिशा व बळ मिळते!” अशी भावना व्यक्त केली.

या प्रसंगी युवा नेते प्रथमेश मालक इंगळे, व्यंकटेश पुजारी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, विपुल जाधव, श्रीकांत मलवे यांच्यासह भाविक भक्त आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येत स्वामींच्या चरणी नतमस्तक होण्याचा हा प्रसंग भक्तिभाव आणि सदिच्छांच्या वातावरणात संपन्न झाला. स्वामी समर्थांच्या कृपाशीर्वादाने सर्व मान्यवरांच्या सामाजिक व लोकसेवेच्या कार्याला अधिक बळ मिळो, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page