08/06/2025

जेऊर येथील सौ. किरण वळेकर यांना विमा क्षेत्रातील सर्वोच्च असा MDRT 2023 पुरस्कार आणि अमेरिका दौऱ्यासाठी निवड

0
IMG-20221203-WA0055.jpg

जेऊर, दि. 3 (करमाळा-LIVE)-
विमा क्षेत्रातील सर्वोच्च बहुमान MDRT 2023 (मिलियन डाॅलर राऊंड टेबल) हा पुरस्कार जेऊर येथील सौ. किरण धनंजय वळेकर यांना मिळाला असून त्यांची अमेरिका परदेश दौऱ्यासाठी निवड झालेली आहे.

जेऊर येथील मुख्य आयुर्विमा सल्लागार धनंजय वळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा बहुमान एलआयसी (LIC) बार्शी शाखे अंतर्गत जेऊरला दुसर्‍यांदा मिळालेला आहे.

देशभरात एलआयसी चे तेरा लाख विमा प्रतिनिधी आहेत, त्यापैकी अडीच ते तीन हजार प्रतिनिधी स्पर्धेतून पात्र होतात तो बहुमान आपल्या ग्रामीण भागातून काम करत असणाऱ्या सौ किरण वळेकर या महिला प्रतिनिधीस मिळाला असून याकामी प्रमुख विमा सल्लागार धनंजय वळेकर यांचेकडून मार्गदर्शन लाभले तसेच बार्शी शाखेचे शाखाधिकारी तुषार घाडगे, करमाळा शाखेचे शाखाधिकारी सुदर्शन शिरूरकर तसेच विविध स्तरातील मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page