पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बात: 2022 चा मागोवा तर 2023 चे स्वागत


करमाळा, दि. 25 (करमाळा-LIVE)-
करमाळा शहरातील मौलाली माळ येथील कार्यक्रमाचा लाभ घेऊन माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिनानिमित्त सुशासन दिन साजरा केला.
यावेळी भाजप तालुका सरचिटणीस श्याम सिंधी, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष विजय नागवडे, ओंकारराजे निंबाळकर, भाजप सोशल मिडिया तालुकाध्यक्ष नितीन कांबळे, संजय गांधी योजनेचे नरेंद्रसिंह ठाकूर, माजी शहर उपाध्यक्ष अविनाश कांबळे, सुहास ओहोळ आदी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या कार्यक्रमाद्वारे सरत्या वर्षांमधील काही महत्त्वाच्या घटनांना उजाळा दिला स्वातंत्र्यच्या अमृत महोत्सव वर्षांनिमित्त हर घर तिरंगा अभियानाद्वारे भारतीयांची एकजूट दिसली त्याचबरोबर अर्थव्यवस्थेबाबत जगाच्या स्पर्धेत भारताचे पाचवे स्थान जी-20 समुहमध्ये भारताची अध्यक्षता ही आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे.
कॉमनवेल्थ गेम, महिलांचे हॉकी मधील स्थान, स्वदेशी एअरक्राफ्ट आय एन एस विक्रांताची यशस्वी कामगिरी, स्पेस, ड्रोन, डिफेन्स सेक्टरमध्ये भारताचे कामगिरी याबरोबरच गुजरात माधवपूर येथील सांस्कृतिक मेला याद्वारे रुक्मिणी विवाह तसेच काशी तमिल् संगम या अभूतपूर्व उत्सव पार पडले याची आठवण त्यांनी करून दिली. मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटर यांच्यावतीने रिसर्च द्वारे असे सिद्ध केले की योग साधना मुळे ब्रेस्ट कॅन्सर या व्याधी बरोबर योग मुकाबला करण्यासाठी सकारात्मक परिणाम दाखवत आहे. तसेच 2025 पर्यंत देश टीबी मुक्त करायचा आहे. नुकतेच गोवा येथे वर्ल्ड आयुर्वेदिक काँग्रेस या कार्यक्रमाद्वारे 40 पेक्षा जास्त देशांनी सहभाग घेऊन साडे पाचशे सायंटिफिक पेपर प्रेझेंट तसेच 215 कंपनीने आपले प्रॉडक्ट ठेवले होते तसेच आठ वर्षांपूर्वी नमो मी गंगे या अभिियानाद्वारे सुरू केलेले अभियानाला उत्तम प्रतिसाद लाभला तसेच याची नोंद युनायटेड नेशनने घेऊन जगातील दहा रिस्टोर करणाऱ्या इकोसिस्टीमच्या विश्वाच्या 160 इन्सेंटिव्ह मध्ये सन्मान करण्यात आला आहे ही पर्यावरण रक्षक बाबत उल्लेखनीय बाब आहे.
पालघर येथील आदिवासी बांधव कडुन बांबूपासून विविध वस्तुबनविल्या जात आहेत याबाबत त्याचे कौतुक केले. 25 डिसेंबर अटलजींच्या स्मृतींना उजाळा देऊन ख्रिसमसच्या शुभेच्छा देऊन नववर्षाचे स्वागत करूया आणि देश बलशाली करूया तसेच कोरोना चे नियम पाळून कोरोनाला कायमचा हद्दपार हरूया असा संदेश दिला.
