विज्ञान प्रदर्शनात भारत हायस्कूलच्या आर्यन गुळमे चे यश


जेऊर, दि. 27 (करमाळा-LIVE)–
जेऊर येथील भारत हायस्कूलच्या आर्यन किशोर गुळमे याचा कोंढेज येथे झालेल्या केंद्रस्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये इयत्ता सहावी ते सातवी मोठ्या गटामध्ये प्रथम क्रमांक आला आहे.
आर्यन याने आपत्कालीन बेल हा विज्ञान प्रयोग बनवला होता. हा प्रयोग टाकाऊ वस्तू पासून बनवला होता. सदर विज्ञान प्रदर्शन गटशिक्षण अधिकारी राजकुमार पाटील साहेब व गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या संकल्पनेतून भरवण्यात आले होते. या अगोदर कविटगांव येथे झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात आर्यन याचे सहावी ते सातवी या गटात प्रथम क्रमांक आला होता. त्याने जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभाग नोंदवला होता. हे उपकरण शेतकऱ्यांसाठी खूप लाभदायक ठरणार आहे. भविष्यात हे उपकरण खूप अद्यावत करण्याचा त्याचा संकल्प आहे. यासाठी त्यास किरण हजारे, पारेकर सर, ढेंबरे सर, पाटकुलकर सर, शेलार सर यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल संस्था अध्यक्ष माजी आमदार नारायण पाटील, सचिव अर्जुन सरक, प्राचार्य केशव दहिभाते, उपप्राचार्य एन.डी.कांबळे, पर्यवेक्षक, बी. एस शिंदे यांनी अभिनंदन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कात्रेला सर, खटके सर, आदलिंग सर, कन्हेरे सर,भंडारे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
