October 9, 2026

जेऊर येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने सावित्रीमाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

0
IMG-20230104-WA0012.jpg

जेऊर, दि. 4 (करमाळा-LIVE)-
स्त्री जर मानसिक गुलाम असेल तर येणाऱ्या पिढ्या सुध्दा मानसिक गुलाम होतात हे जाणून ज्या महात्मा फुले यांनी मुलीसाठी पहिली शाळा काढली व ते कार्य निरनंतर खंड पडू न देता मान- अपमान सहन करून शिक्षण दिले ती विद्येची देवता “सावित्रीमाई फुले” यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन जेऊर येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने करण्यात आले.

यावेळी ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंती निमित्त प्रथम प्रतिमेचे पुजन करण्यात आले. सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये व अंगणवाडी मध्ये खाऊवाटप व शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय कार्याध्यक्ष नितीन खटके, बाळासाहेब झोळ (मराठा सेवा संघ ता उपाध्यक्ष करमाळा), पांडुरंग घाडगे, सुहास शिंदे, सुहास पोळ (संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष करमाळा), राकेश पाटील (राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष करमाळा), अतुल निर्मळ ( जेऊर शहराध्यक्ष), आदिनाथ माने, पिंटू जाधव, महेश कांडेकर, सचिन गारुडी, रोहन गरड, नानासाहेब पोळ, आनंद गरड, संकेत भोसले, रणजित कांबळे, अभिजीत म्हमाणे, राहुल सरडे, हेमंत शिंदे, नितीन कांडेकर, अजित उपाध्ये, अरूण तावरे, गगन सोळंकी, अभिराज कुंभार, शिवम कांडेकर, रोहित सरडे, सागर बनकर, आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page