बार्शी: आमदार राजेंद्र राऊत यांच्यावरील हल्ला प्रकरणी सहा जणांची निर्दोष मुक्तता


सदर प्रकरणी आरोपीतर्फे अॕड मिलिंद थोबडे, अॕड निखिल पाटील यांनी तर सरकार पक्षातर्फे अॕड दत्ता पवार यांनी काम पाहिले.
करमाळा, दि. 8 (करमाळा-LIVE)-
बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्यावरील हल्ला प्रकरणी सहा जणांची निर्दोष मुक्तता झालेली आहे.
याबाबत हकीकत अशी की, दि. 19 एप्रिल 2004 रोजी मौजे कुसळंब (ता.बार्शी) येथे राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झालेला होता व तदनंतर सदर खटल्यामधील मूळ फिर्यादी आमदार राजेंद्र राऊत यांचे सह विजय राऊत, पट्टम पवार, संजय देशमुख, सुधीर बारबोले, किरण तोर, राजा काकडे असे सर्वजण मौजे कुसळंब येथे गेले असता तेथे त्यांच्यावरही दगडफेक झाली होती व त्यानंतर तेथून पांगरी पोलीस स्टेशन कडे परत येत असताना रस्त्यात त्यांचेवर खुनी हल्ला झालेला होता व सदर प्रकरणी राजेंद्र राऊत यांनी फिर्याद दाखल केली होती सदर फिर्यादीवरून आरोपी
1) शिरीष वैजनाथ जाधव
2) राजेश वैजनाथ जाधव
3) गणेश वैजनाथ जाधव
4) दिनेश वैजनाथ जाधव
5) रामेश्वर जालिंदर मांजरे
6) पिंटू उर्फ नवनाथ भीमाशंकर माळगे
व इतर तीन यांचे विरुद्ध भादवि कलम 307,147,148,149तसेच बॉम्बे पोलीस ऍक्ट कलम 135 नुसार गुन्हा दाखल झाला होता तपासा दरम्यान यातील आरोपी नंबर एक ते सहा यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
सदर खटल्याची सुनावणी बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री जे.सी.जगदाळे यांच्यासमोर झाली सुनावणी दरम्यान मुळ फिर्यादी आमदार राजेंद्र राऊत जखमी साक्षीदार तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व तपास अधिकारी यांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या तर आरोपी तर्फे अॕड मिलिंद थोबडे यांनी युक्तिवाद केला त्यांचे युक्तिवादात सदरची घटना अंधारात घडलेली असून फिर्यादी अथवा इतर साक्षीदारांनी संशयित आरोपी यांना ओळखलेले नाही तसेच त्यांच्याविरुद्ध इतर कोणताही सक्षम पुरावा नाही त्यामुळे त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात यावी असा युक्तिवाद केला सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून यातील आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
