07/06/2025

करमाळ्यातील YCM च्या विद्यार्थ्यांचे फिसरे येथे सात दिवसांचे श्रमसंस्कार शिबीर

0
IMG-20230120-WA0007.jpg

करमाळा, दि. 20 (करमाळा-LIVE)-
करमाळ्यातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय (YCM) च्या विद्यार्थ्यांचे फिसरे येथे सात दिवसांचे श्रमसंस्कार शिबीर सुरू झालेले आहे.

सध्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना वेध लागलेले असून याच योजनेच्या युनिटचा आत्मा म्हणजेच कॅम्प असतो. यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तर्फे श्रमसंस्कार शिबीर आयोजन केलेल आहे. या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार समीर माने
यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्या विकास महामंडळाचे सचिव विलासराव घुमरे उपस्थित होते. या शिबिरामध्ये आदर्श ग्राम तसेच सेंद्रिय शेती, शेतकरी मेळावा अशा अनेक महत्वपूर्ण विषयांवर व्याख्यान आयोजित केली आहेत.

तसेच गावातील संपूर्ण स्वच्छता केली जाणार असून वृक्षारोपण शिबीरामार्फत केले जाणार आहे. गावातील संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याची माहिती माहिती घेऊन विमा उतरवण्याचे काम शिबिरामार्फत केले जाणार आहे. यामध्ये मतदान जनजागृती, हळदी कुंकू समारंभ, विधवा महिलांचा सन्मान यात केला आहे. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. अशाप्रकारे येथे सात दिवसांचे श्रम संस्कार शिबीर आयोजित केले आहे.

हॉटेल शिवम प्राईड, शेलगावं

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page