October 12, 2026

जेऊरच्या भारत शैक्षणिक संकुलात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांनी सादर केले लेझिम, टिपरी आणि मल्लखांब च्या चित्तथरारक कसरती

0
IMG-20230126-WA0015.jpg

जेऊर, दि. 26 (करमाळा-LIVE)– जेऊर येथील भारत शैक्षणिक संकुलात 73 वा प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला.

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण मंडल अधिकारी वळेकर भाऊसाहेब यांच्या हस्ते करण्यात आले. युवानेते पृथ्वीराज पाटील, पाटील गटाचे सुनील तळेकर, संस्थेचे उपाध्यक्ष अनिल गादिया, सचिव अर्जून सरक, संचालक संजय दोशी, श्री पाथ्रुडकर, जेष्ठ व्यापारी सुनिल बादल, हायस्कूलचे प्राचार्य केशव दहिभाते, उपप्राचार्य एन.डी कांबळे, महाविद्यालयाचे प्राचार्य अनंत शिंगाडे, प्रायमरीचे मुख्याध्यापक दीपक व्यवहारे उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेच्या मैदानावर क्रीडाशिक्षक पांडूरंग वाघमारे आणि बाळासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मल्लखांब चे चित्तथारक प्रात्यक्षिके करण्यात आली. तसेच मुले आणि मुलींनी लेझिम तर शाळेच्या मुलींनी टिपऱ्या सादर केल्या. यावेळी एम.सी.सी.च्या वतीने मानवंदना देण्यात आली.

व्हिडीओ आणि फोटो सौजन्य- श्री सुनिल बादल, जेऊर

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page