07/06/2025

महाबळेश्वरची स्ट्राॕबेरी आता करमाळा तालुक्यात; वांगीच्या शेतकऱ्याचा स्ट्राॕबेरी शेतीचा प्रयोग यशस्वी

0
IMG-20230212-WA0003.jpg
हॉटेल शिवम प्राईड

चिखलठाण, दि. 12 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील वांगी-3 येथील शेतकरी विकास वाघमोडे यांनी स्ट्राॕबेरी शेतीचा प्रयोग यशस्वी केला असून त्यांना केवळ सात गुंठ्ठे क्षेत्रावर चार लाख रूपयांचे उत्पन्न मिळणार आहे.

स्ट्रॉबेरी म्हणले की आपल्यापुढे समोर उभा राहतो तो सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर परिसर मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेणारा हा भाग सोलापूर जिल्ह्यातील हवामान स्ट्रॉबेरी साठी प्रतिकूल असल्याने येथे स्ट्रॉबेरीचे उत्पादन होऊ शकणार नाही असा समज होता परंतु हा निष्कर्ष चुकीचा ठरवत वांगी तालुका करमाळा येथील विकास वाघमोडे या शेतकऱ्याने स्ट्रॉबेरी शेतीचे चॅलेंज स्वीकारत ही शेती यशस्वी करून आपल्या सात गुंठे क्षेत्रांमध्ये आजपर्यंत सव्वा दोन लाख रुपयांचे उत्पादन मिळवले असून आणखी दोन लाखाचे उत्पन्न त्यांना अपेक्षित आहे.

उजनी धरणाच्या काठावर असलेल्या वांगी गावांमध्ये मुख्यतः ऊस व केळी हीच पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात या दोन्ही पिकांमध्ये उत्पादन चांगले मिळत असले तरी या पिकासमोर ही भविष्यात अनेक अडचणी असल्याने या परिसरातील शेतकरी फळबागांसारखा नवीन पर्याय शोधण्यात सुरू केला आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील हवामानात आजपर्यंत होऊ न शकलेले अनेक प्रयोग शेतकरी यशस्वी करत असून यामध्ये भरघोस उत्पादन मिळवणे शक्य करून दाखवले आहे.

वांगी-3 येथील प्रगतशील शेतकरी विकास वाघमोडे यांनी आजपर्यंत केळी व ऊस या पिकांमध्ये सर्वोत्तम उत्पादन घेऊन नावलौकिक कमावलेला आहे त्यांच्या महाबळेश्वर येथील मित्रांच्या सूचनेवरून स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला यामध्ये कोणत्याही रासायनिक खताचा वापर न करता सात गुंठे क्षेत्रावर नोव्हेंबर मध्ये त्यांनी सातारा जिल्ह्यातील भिलारवरून रोपे आणून स्ट्रॉबेरीची एक फुट अंतरावर बेडवर लागवड केली. कसल्याही रासायनिक खताचा वापर न करता एस.पी ॲग्रोटेक चे सागर पार्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जैविक खतांचा वापर करत उत्कृष्ट असा प्लॉट तयार केला. साधारण एक लाख रुपये खर्च झाला.आत्तापर्यंत त्यांनी स्वतः स्थानिक बाजारपेठेत व बारामती, बार्शी येथील व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडून जागेवर स्ट्रॉबेरीची खरेदी केली सरासरी तीनशे रुपयाचा दर मिळवून सव्वा दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. आणखी दोन लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. सध्या स्टॉबेरी शेतीचा प्रयोग या परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरत आसून‌ पुढील वर्षी या परिसरातील अनेक शेतकरी हे पिक घेण्याच्या तयारीत आहेत.

करमाळा तालुक्यात स्ट्राॕबेरीचे उत्पादन होऊ शकत नाही असे अनेक शेतकरी मला सांगत होते परंतु आपण प्रयोग तरी करून बघू म्हणून मी थोड्या क्षेत्रावर लागवड केली होती. माझ्या शेतातातील तयार झालेली स्टॉबेरी मी महाबळेश्वर येथील मित्राला पाठवली त्यांनी पिकांची गुणवत्ता व चव येथिल स्टॉबेरी पेक्षा उत्तम असल्याचे सांगितले. हा प्रयोग यशस्वी झाल्याने आत्मविश्वास निर्माण झाला असून पुढील वर्षी अनखी जादा क्षेत्रात लागवड करणार आहे.

विकास वाघमोडे (स्ट्राॕबेरी उत्पादक शेतकरी वांगी-3)

विकास वाघमोडे यांचा स्टॉबेरी शेतीचा प्रयोग यशस्वी झाला असुन गावातील आम्ही इतर शेतकऱ्यांची हे पिक घेण्याची तयारी आहे.या पिकासाठी होणारा खर्च जादा असल्याने कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना रेफर व्हॅनसारख्या विविध सुविधा व अनुदान उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

गणपत कापसे, (शेतकरी वांगी-3)

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page