तुझा पिरतीचा हा विंचू मला चावला! गाणं पुन्हा एकदा चर्चेत- शाळकरी मुलाचा व्हिडीओ व्हायरल

जेऊर, दि. 17 (करमाळा-LIVE)-
फँड्री चित्रपटातील तुझा पिरतीचा हा विंचू मला चावला! हे गाणं पुन्हा एकदा चर्चेत आलेले असून एका शाळकरी मुलाने हे गाणं म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल झालेला आहे. तर त्या गाण्यात बेंच वाजवून दुसऱ्या मुलानेही चांगलीच साथ दिली आहे.
जेऊर चे सुपुत्र आणि फँड्री, सैराट, झुंड चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा फँड्री हा चित्रपट 2013 साली रिलीज झाला होता. या चित्रपटात जब्या आणि शालू यांच्या प्रेम कथेवर हा चित्रपट होता, या चित्रपटात असलेल्या तुझा पिरतीचा हा विंचू मला चावला! या गाण्याने तरूणाईला अक्षरशः वेड लावले होते, आजही दहा वर्षांनंतर या गाण्याची क्रेझ कायम असुन नुकताच एक शाळकरी मुलाचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
दरम्यान नागराज मंजुळे यांचा बहुचर्चीत ‘घर बंदूक बिरयाणी’ हा नवा चित्रपट येत्या 7 एप्रिल ला प्रदर्शित होणार आहे.

