07/06/2025

सोगावं (पश्चिम) येथे शिवसेनेच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन

0
IMG-20230218-WA0021.jpg

करमाळा, दि. 18 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील पश्चिम सोगावं येथे युवासेनेच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन आज करण्यात आले.

युवासेना विस्तारक उत्तमजी आयवळे, जिल्हा प्रमुख सचिन बागल यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांच्या नेतृत्वाखाली व शिवसेना माजी तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे, संघटक संजयजी शिंदे, शहरप्रमुख प्रवीणजी कटारीया यांच्या प्रमुख उपस्थितीत आज महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर सोगावं (प) येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेची पहिली शाखा स्थापन करण्यात आली.

या कार्यक्रमास युवासेना तालुका समन्वयक उपसरपंच पांडुरंग ढाणे, उपतालुकाप्रमुख अभिषेक मोरे, हणुमंत रंदवे उपस्थित होते. युवा सेना शाखाप्रमुख पदी ओकांर कोठारे तर उपशाखाप्रमुख पदी मयुर तावरे,खजिनदार पदी विशाल नवगण सचिवपदी समाधान गोसावी यांची नियुक्ती करण्यात आली.

माजी तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे, संघटक संजय शिंदे, शहरप्रमुख प्रवीण कटारीया तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे,उपतालुकाप्रमुख अभिषेक मोरे यांनी या प्रसंगी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माऊली बोराडे, जनार्धन पाखरे, सोमनाथ कोठारे, सुमित तावरे, समाधान भोसले, तुषार शिंदे, सौरभ राऊत, सचिन काळे, वैभव गोसावी, योगेश नगरे, ज्ञानेश्वर राऊत, करण नगरे, विजय राऊत, अनिकेत नवगण, चंद्रकांत पाठक, शुभम कदम आदिंनी परीश्रम घेतले यावेळेस गावातील आजी माजी सरपंच उपसरपंच सर्व सदस्य व ग्रामस्थ युवासैनिक मोठ्या संख्येत उपस्थित होते. सुत्रसंचालन ओकांर कोठारे तर आभार सुमित तावरे यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page