07/06/2025

हिवरे-कोळगावं-निमगावं या गावांना वगळून जाणार मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा रस्ता; नागरिक नाराज- आमदारांनी लक्ष घालावे युवासेनेची मागणी

0
IMG_20230312_122042.jpg

करमाळा, दि. 12 (करमाळा-LIVE)-
पुर्वभागातील फिसरे, हिसरे, हिवरे, कोळगावं, निमगावं या रस्त्यांच्या दुरुस्थी साठी नुकताच ८ कोटी ८६ लाख रू निधी मंजूर झालाअसल्याचे वृत प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांकडून समाधान व्यक्त करुण आमदार संजयमामा शिंदे व  प्राशासनाचे आभार व्यक्त करण्यात येत होते मात्र हिवरे, कोळगावं, निमगावं या गांवाना वगळून एक ही वाडी वस्ती, शाळा, मंदीर नसलेल्या मार्गावरून हा रस्ता थेट गौंडरेला जोडला जाणार असल्याचे समजल्याने हिवरे, कोळगावं, निमगावं या तीन गावातील नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

पूर्वभागातील फिसरे ते गौंडरे गावाला जोडणाऱ्या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दुरावस्था आहे. फिसरे, हिसरे, हिवरे, कोळगाव, निमगाव ते गौंडरे हा संपूर्ण रस्ता मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतुन पुर्ण करावा अशी अनेक दिवसांची या गावातील नागरींकाची मागणी होती. यासाठी एक पत्रकार युवासेना तालुकाप्रमुख या नात्यांने मी स्वतः देखील या मागणीसाठी वारंवार आंदोलने केली आहेत.

या अगोदर निमगावं पासून गौंडरे पर्यंतचे दोन-तीन किलोमीटर रस्त्याचे प्राधान मंत्री ग्राम सडक योजनेतुन काम पुर्ण होत आहे. तर काल मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतुन फिसरे, हिसरे, हिवरे, कोळगावं, निमगावं या रस्त्यासठी ८ कोटी ८६ लाख रुपयांपर्यंत निधी मंजूर झाल्याने वरील गावांचा राज्य क्रमांक ६८ या मुख्य रस्त्यास जोडणारा प्रवास सुखकर होण्याचे वृत्त व मंजुरीचे परिपत्रक आमदार संजय मामा शिंदे यांच्या कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आले होते. मात्र या  निधीतुन हिसरे पासुन पुढे हिवरे, कोळगावं, निमगावं या गावांचा रस्ता न होता  हिसरे मधून थेट गौंडरे ला जाणार असल्याचे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आल्याने हिवरे ,कोळगाव निमगाव या भागातील नागरिकांकडून तीव्र नाराजी चा सुर उमटत आहे.

हिवरे, निमगावं, कोळगावं या रस्त्यावरुनच परिवहन विभागाची बस धावत असते या तीन गावांची मिळून दहा ते बारा हजार लोकसंख्या असून  शेकडो विद्यार्थी गौंडरे, हिसरे व करमाळा येथे शिक्षणासाठी ये जा करत असतात.  त्याच बरोबर  संपुर्ण राज्यात प्रसिद्ध असलेल्या हिवरे येथील श्री नागनाथ देवस्थान अनेक भाविक येत असतात मात्र असे असताना मुख्यमंत्री सडक योजनेतून आलेला निधी या रस्त्यावर खर्च न होता ज्या जिथे एकही लोकवस्ती नाही,मंदीर नाही शाळा नाही गाव नाही अशा रस्त्यावर हा निधी खर्च कशासाठी? व कोणाच्या सोयीसाठी केला जात आहे? असा संतप्त सवाल हिवरे ,कोळगाव निमगाव या भागातील नागरिकांकडून विचारला जात आहे.

फिसरे पासून गौंडरे पर्यंतच्या  संपूर्ण रस्त्यासाठी प्रधान मंत्री किवा मुख्यमंत्री सडक योजनेतुन निधी उपलब्ध करून हा रस्ता डांबरीकरण करावा अशी सातत्यपूर्ण मागणी करत होतो. निधी मंजूर झाल्याचे समजल्यानंतर आनंद झाला मात्र हिसरे मधून हा रस्ता थेट गौंडरे ला जाणार असल्याचे समजले त्यामुळे  तीन गावातील सर्व सामान्य नागरिकांना याचा कोणताच फायदा होणार नाही. त्यामुळेच आमदार संजय मामा शिंदे यांना संपर्क साधून हा रस्ता मुख्य रहदारीच्या मार्गावरून करावा अशी विनंती केली आहे  तसेच लवकरच शिष्टमंडळासह आमदार संजयमामा शिंदे भेटून निवेदन देणार आहोत.

शंभूराजे शाहुराव फरतडे, युवासेना तालुकाप्रमुख (ठाकरे गट)

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page