जेऊर रेल्वे स्टेशनवर कोणार्क एक्सप्रेस तर केम रेल्वे स्टेशनवर कन्याकुमारी एक्सप्रेसला थांबा


जेऊर, दि. 23 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी असून माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रयत्नातून जेऊर रेल्वे स्टेशनवर कोणार्क एक्सप्रेसला तर केम रेल्वे स्टेशनवर कन्याकुमारी एक्सप्रेस या रेल्वे गाड्यांना थांबा मिळाला आहे.
सोलापूर विभागातील माढा, जेऊर व केम या रेल्वे स्थानकावर तीन वेगवेगळ्या एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांना थांबा मिळाला आहे. यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रयत्नातून हे थांबे मिळाले आहेत, अशी माहिती भाजपचे करमाळा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी दिली आहे.
जेऊर येथे थांबा कोणार्क एक्सप्रेस वेळापत्रक पुढीलप्रमाणे- गाडी क्रमांक 11020 कोणार्क एक्सप्रेस-
1) सोलापूर- 06.05 (संध्याकाळी)
2) जेऊर- 8.35 (रात्री) अंदाजे वेळ
3) पुणे- 11.40 (रात्री)
4) दादर- 3.25 (पहाटे) दुसरा दिवस
5) सीएसएमटी- 4.00 (पहाटे) दुसरा दिवस
www.karmalalive.in
गाडी क्रमांक 11019 कोणार्क एक्सप्रेस-
1) सीएसएमटी- 2.00 (दुपारी)
2) दादर- 2.15 (दुपारी)
3) पुणे- 6.00 (संध्याकाळी)
4) दौंड- 7.12 (संध्याकाळी)
4) जेऊर- 8.00 (रात्री) अंदाजे वेळ
5) सोलापूर- 9.55 (रात्री)
www.karmalalive.in
केम येथे थांबा कन्याकुमारी एक्सप्रेस वेळापत्रक पुढीलप्रमाणे-
गाडी क्रमांक 16382 कन्याकुमारी एक्सप्रेस-
1) सोलापूर- 5.20 (संध्याकाळी)
2) कुर्डूवाडी- 16.30 (संध्याकाळी)
3) केम- 7.00 (रात्री) अंदाजे वेळ
4) दौंड- 8.55 (रात्री)
5) पुणे- 10.20 (रात्री)
गाडी क्रमांक 16381 कन्याकुमारी एक्सप्रेस-
1) पुणे- 11.50 (रात्री)
2) दौंड- 1.00 (रात्री)
3) केम- 2.00 (रात्री) अंदाजे वेळ
4) कुर्डूवाडी- 2.25 (दुपारी)
5) सोलापूर- 3 40 (पहाटे)
टीप- कोणार्क एक्सप्रेस आणि कन्याकुमारी एक्सप्रेसला मिळालेला थांबा चे जेऊर आणि केम येथील वेळ अपडेट झालेले नाहीत. जेऊर आणि केम थांबा वेळ तात्पुरता अंदाजे टाकण्यात आला आहे.

