सोलापूर विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक होणार- पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील


करमाळा, दि. 8 (करमाळा-LIVE)-
सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच भव्य स्मारक लवकरच उभारण्यात येणार आहे याची माहिती स्मारक समितीचे अध्यक्ष तथा सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन भवन सोलापूर येथे पार पडली.
या प्रसंगी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार सुभाष देशमुख, स्मारक समितीच्या कार्याध्यक्षा तथा विद्यापीठाच्या कुलगुरू मृणालिनी फडणवीस, स्मारक समितीचे सदस्य तथा विद्यापीठ नामांतर समितीचे अध्यक्ष प्रा शिवाजीराव बंडगर, शिवाजीराजे कांबळे, माऊली हळणवर, अमोल कारंडे, बापू मेटकरी, नागेश वाघमोडे, भारत माने, विष्णू बिचकुले आदी उपस्थित होते.
दिल्ली येथील प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यानी तयार केलेला पुणश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा विद्यापीठात दाखल झाला आहे. लवकरच त्याचे अनावरण होणार आहे. या बाबत मंत्री विखे पाटील यांच्या समवेत समिती ची चर्चा झाली. यावेळी पालकमंत्री श्री विखे-पाटील यानी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, यांच्या सोबतच केंद्रीय गृहमंत्री यांनाही निमंत्रित करण्याचे प्रस्तावित असल्याचे सांगितले.
त्यासाठी मंगळवारी स्मारक समिती ची मुंबईत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या समवेत बैठक होणार असल्याची माहिती मंत्री विखेपाटील यानी दिली.

