09/06/2025

करमाळ्यातील कुटीर रुग्णालयात बाळंतपणासाठी सक्षम व्यवस्था- डॉ स्मिता बंडगर

0
IMG-20230409-WA0023.jpg

करमाळा, दि. 9 (करमाळा-LIVE)-
बाळंतपणासाठी करमाळा उपजिल्हा रुग्णाला सक्षम यंत्रणा असून तज्ञ डॉक्टर व भूलतज्ञ उपलब्ध असून अत्यंत काळजीपूर्वक या सर्व प्रसूती केल्या जात असून रुग्णांनी याचा फायदा घ्यावा असे आव्हान डॉ. स्मिता बंडगर यांनी केले.

करमाळा तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात गतवर्षी 700 प्रसूती झाली असून पैकी फक्त 180 महिलांना सिजरिंग करण्याची वेळ आली बाकी सर्व नॉर्मल पद्धतीने बाळंतीण झाल्या आहेत.

डॉ स्मिता बंडगर या करमाळा उपजिल्हा रुग्णालयात कार्य झाल्यापासून एक आदर्श डॉक्टर म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. जास्तीत जास्त नॉर्मल प्रसूती करण्यावर त्यांचा भर असून त्यांच्या या कामाबद्दल शिवसेनेच्या वतीने आज त्यांचा सत्कार जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार नासिर कबीर, युवा सेनेचे तालुकाप्रमुख राहुल कानगुडे, शहर प्रमुख विशाल गायकवाड, शाखाप्रमुख मारुती भोसले, वैद्यकीय सहाय्यक नागेश चेंडगे, वैद्यकीय कक्ष प्रमुख रोहित वायबसे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ गजानन गुंजकर, डॉ भोसले, सुखदेव लष्कर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच ऑपरेशन थिएटर मध्ये डॉक्टरांना साहित्य वेळेवर मदत करणाऱ्या परिचारिका श्रीमती शिंदे व ऑपरेशन झालेल्या पेशंटला सुविधा देणाऱ्या परिचारिका श्रीमती थोरात तसेच डॉ सुजित पाटील हे भुलतज्ञ म्हणून अहोरात्र उपजिल्हा रुग्णालयात सेवा देत असल्यामुळे त्यांचाही सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना डॉ. स्मिता बंडगर म्हणाल्या की, शासकीय रुग्णालयात चांगल्या सेवा मिळत नाही असा अपप्रचार झाल्यामुळे आवश्यकता असताना सुद्धा रुग्ण शासकीय रुग्णालयात उपचार घेत नाहीत. शासकीय रुग्णालयात सुद्धा दर्जेदार उपचार दिले जातात. गेल्या वर्षभरात सातशे प्रसूतीपैकी 520 नॉर्मल डिलिव्हरी झाले आहे तर 180 महिलांना सिजरिंग करावे लागले व सर्व महिला सुरक्षित आहेत. शासकीय रुग्णालय दाखल झाल्यानंतर शासनाच्या सर्व योजनेचा फायदा संबंधित रूग्णाला मिळतो.

यावेळी बोलताना महेश चिवटे म्हणाले की, संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य सेवेत प्रचंड बदल होत आहेत करमाळा उपजिल्हा रुग्णालयात सर्व सोयी चांगल्या दर्जाच्या देण्यासाठी डॉक्टरांना सूचना देण्यात आलेल्या असून शिवसेनेचे या सर्व प्रकाराकडे लक्ष आहे. डॉ. स्मिता बंडगर व डॉक्टर सुजित पाटील असे समाजाची जाण असलेले व गोरगरिबाची जाणीव असलेले डॉक्टर उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाल्यामुळे सेवा चांगली मिळत आहे. खाजगी रुग्णालयात नाही त्याच्यापेक्षा चांगली सोय उपजिल्हा रुग्णालयात आहे यामुळे सरकारी दवाखाने चांगले उपचार करत नाही ही भावना मनातून काढून टाकावी व सर्वांनी उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या सोयीचा फायदा घ्यावा या ठिकाणी काही आडूनच झाल्यास त्यांनी शिवसेना कार्यालयाचे संपर्क साधावा अशी आवाहन केले.

या जन्मलेल्या बाळांपैकी 376 बाळ पुरुष जातीचे तर 320 बालके स्त्री जातीचे जन्मले आहेत.


About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page