08/06/2025

एक महिना लोटला तरी जेऊर रेल्वे स्टेशनवर कोणार्क एक्सप्रेसला थांबा नाही; जनता संभ्रमात

0
IMG-20230323-WA0023.jpg

जेऊर, दि. 19 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील प्रवाशांसाठी जेऊर रेल्वे स्टेशनवर कोणार्क एक्सप्रेसला थांबा मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते परंतु अजून पर्यंत जेऊर रेल्वे स्टेशनवर कोणार्कला अधिकृतपणे थांबा मिळालेले नसून एक महिना होत आला तरी कोणार्क थांब्याचा काही थांब पत्ता लागेना झाला आहे.

सोलापूर विभागातील माढा, जेऊर व केम या रेल्वे स्थानकावर तीन वेगवेगळ्या एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांना थांबा मिळणार तसेच तसेच जेऊर रेल्वे स्टेशनवर कोणार्क एक्सप्रेस थांबणार असल्याचे 23 मार्च रोजी बातमी आली होती. एक महिना होत आला आहे तरी पण अजूनही थांबा मिळालेला नसल्यामुळे आता शंका निर्माण होत असून थांबा मिळाला नाहीतर ही करमाळा तालुक्यातील जनतेची फसवणूक झाली असे मत तालुक्यातील जनता म्हणत आहे.

याबाबत सोलापूर येथील डिआरएम आॕफिस मधील जनसंपर्क अधिकारी यांच्याशी दुरध्वनी द्वारे संपर्क साधला असता, अजून पर्यंत कुठल्याही प्रकारचे कोणार्क थांबा बाबतीतील अधिकृत पत्र मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

जेऊर रेल्वे स्टेशनवर हुतात्मा एक्सप्रेसला थांबा मिळावा यासाठी मोर्चा काढण्यात आला होता, त्यानंतर जेऊर रेल्वे स्टेशनवर कोणार्क एक्सप्रेसला थांबा मिळाला असल्याच्या बातम्या आल्या, 23 मार्च पासून आतापर्यंत अजूनही कोणार्क एक्सप्रेसला थांबा मिळाला नाही, जनतेतून नाराजीचा सूर आहे.

श्री सुहास सुर्यवंशी, अध्यक्ष प्रवासी संघटना जेऊर

www.karmalalive.in

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page