करमाळा : हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन



करमाळा, दि. 19 (करमाळा-LIVE)-
करमाळ्यात हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंती निमित्त ‘सकल क्षत्रिय राजपुत समाजाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दि.21 मे रोजी सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत सुतारगल्ली येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि. 22 मे रोजी सकाळी 8.30 वाजता मंगळवार पेठ येथील महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्यास महा अभिषेक सोहळा होणार आहे.
त्यानंतर सकाळी 9.30 वाजता सामाजिक उपक्रमात सहभागी युवकांसाठी लकी ड्राॕ काढण्यात येणार आहे. यासोबतच दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत सुतारगल्ली येथे महाप्रसाद होणार आहे.
याच दिवशी सायंकाळी 4 वाजता सुतारगल्ली येथून आकर्षक सजावट केलेल्या रथातून महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक निघणार आहे. या मिरवणूकीत विविध नामांकित वाद्यवृंद (बॅंड) सह विविध हालगी ग्रुप, घोडे इत्यादी प्रमुख आकर्षण असणार आहे.
तरी शहरातील सर्वच समाजबांधवांनी या कार्यक्रमांना उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन हिंदूसुर्य महाराणा प्रतापसिंह उत्सव समिती, करमाळा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

