17/12/2024

करमाळा : भाजपा व्यापार आघाडीच्या मागणीला यश

0
IMG-20230531-WA0013.jpg
शिवम प्राईड, शेलगावं

करमाळा, दि. 31 (करमाळा-LIVE)-
पावसाळ्यापूर्वी करमाळा शहरातील नाले, गटारी आणि रस्त्यांची साफसफाई जलदगतीने करावी अशी मागणी भाजपा व्यापार आघाडीचे शहराध्यक्ष जितेश कटारिया यांनी काही दिवसांपूर्वी प्रसिध्दी पत्रकाद्वारे नगरपालिका प्रशासनाकडे केली होती.
त्यांच्या मागणीला नगरपालिका प्रशासनाने सकारात्मकता दाखवत शहरातील सर्व नाल्यांची साफ सफाई ला सुरुवात केली आहे.

त्या सोबतच श्रीदेवीचा माळ रोड येथील आयडिबीआय बँक जवळील पुलावर संरक्षक कठडे नसल्यामुळे तो भाग धोकादायक बनला होता गेल्या वर्षी नवरात्री वेळी ही बाब त्यांनी नगरपालिका प्रशासनाच्या लक्षात आणून दिली होती त्याला अखेर मुहूर्त लागून तेथील संरक्षक कठडे बांधण्याचे काम सुरू केले असून त्याबद्दल जितेश कटारिया यांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page