07/06/2025

जेऊरच्या भारत हायस्कूलचा दहावीचा 93.18% निकाल

0
20220608_134950.jpg

जेऊर, दि. 2 (करमाळा-LIVE)– महाराष्ट्र माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेचा निकाल जाहीर झाला असून जेऊरच्या भारत हायस्कूलचा 93.18 टक्के निकाल लागला आहे.

एकूण 308 विद्यार्थी या परिक्षेला बसलेले होते, पैकी 287 विद्यार्थी पास झालेले असून हायस्कूल चा 93.18% निकाल लागला आहे.

वाघमारे हर्षवर्धन पांडुरंग 500 पैकी 486 (97.20%) घेऊन प्रथम आला असून, बडे विवेक सुर्यकांत 500 पैकी 484 (96.80%) घेऊन द्वितीय तर म्हमाणे प्रथमेश महालिंग 500 पैकी 479 (95.80%) घेऊन तृतीय आला आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांनाचे संस्था अध्यक्ष माजी आमदार नारायण आबा पाटील, उपाध्यक्ष अनिल गादिया, सचिव प्रा. अर्जून सरक, प्राचार्य केशव दहिभाते, उपप्राचार्य एन.डी कांबळे, पर्यवेक्ष बाळासाहेब शिंदे यांनी अभिनंदन केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page