ग्रामसेवक संघटनेच्या करमाळा तालुकाध्यक्ष पदी ननवरे, उपाध्यक्ष पदी कुदळे तर सचिव पदी केवारे यांची निवड


जेऊर, दि. 7 (करमाळा-LIVE)-
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन DNE 136 सलग्न करमाळा तालुका ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी सुशेन ननवरे यांची तर उपाध्यक्ष पदी यशवंत कुदळे यांची तसेच सचिव पदी दादासाहेब केवारे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
रविवारी नविन कार्यकारणीची निवडणूक पार पडली, ही निवडणूक बिनविरोध झालेली असून नवीन कार्यकारणी पुढीलप्रमाणे-
1) अध्यक्ष- सुशेन देवराव ननवरे
2) सचिव- दादासाहेब तुळशिदास केवारे
3) उपाध्यक्ष- यशवंत बबन कुदळे
4) महिला उपाध्यक्ष- स्वाती श्रीरंग जाधव
5) कार्याध्यक्ष- मनोज अंगद लटके
6) सह सचिव- दत्तात्रय नामदेव निकम
7) कोषाध्यक्ष- तात्यासाहेब हरिभाऊ नलवडे
8) संघटक- आबासाहेब रामदास खाडे
9) महिला संघटक- अनुराधा दत्तात्रय टकले.
