08/06/2025

जेऊर येथील औषध दुकानदाराचा असाही प्रामाणिकपणा! रस्त्यावर सापडलेले सोने केलं परत

0
IMG-20230611-WA0007.jpg

जेऊर, दि. 11 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील जेऊर येथे औषध व्यापाऱ्याचा प्रामाणिकपणा आणि माणूसकी जिवंत असल्याची प्रचिती दिसून आली असून सापडलेले सोने प्रामाणिकपणे परत केले आहे.

जेऊर येथील शितल मेडिकलचे मालक शितल दोशी यांना त्यांच्या दुकानासमोर एक पाकीट पडलेले दिसले, शितल दोशी यांनी ते पाकीट उघडून पाहताच त्यामध्ये आनंद ज्वेलर्स या दुकानातून सोने खरेदी केल्याची पावती आढळून आली.

दरम्यान पहाटे मॉर्निंग वाॅकला जाणारे प्रदिप पवार, प्रविण माळवे यांना याबाबत माहिती दिली. दरम्यान प्रविण माळवे हे आनंद ज्वेलर्स मालक आहेत, त्यांनी हे सोने जेऊर येथील पोटे सिस्टर यांना विक्री केली होती. सोन्याचा दागिना हरवल्यामुळे पोटे सिस्टर्स या चिंताग्रस्त व दुःखी झाल्या होत्या. त्यांच्याशी संपर्क साधून हा दागिना त्यांच्या सुपूर्द करण्यात आला.

शितल दोशी यांच्या प्रामाणिकपणामुळे आणि माणूसकीमुळे पोटे सिस्टर यांना हरवलेले सोने मिळाले. आजच्या धकाधकीच्या व धावपळीच्या काळात सोनं हरवणं ही सामान्य बाब असली तरी माणूसकी हरवत चाललेल्या या जगात माणूसकी आज ही शिल्लक असल्याचे अनुभव आला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page